Lonikand Pune Crime | पुणे : फ्लॅटबाहेरच्या बुटात ठेवलेली चावी हेरली, फ्लॅट उघडून सोन्याचे दागिने व रोकड केली लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lonikand Pune Crime | घर बंद केल्यानंतर घराची चावी कुंडीखाली किंवा बुटात ठेवून बाहेर जात असाल तर सावधान. फ्लॅटबाहेरील बुटात ठेवलेली चावी घेऊन अज्ञाताने घरफोडी (House Burglary In Pune) करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार वाघोली (Wagholi) परिसरात घडला. हा प्रकार शनिवारी (दि.13) दुपारी बाराच्या सुमारास प्रणिती कॉम्प्लेक्स मध्ये घडला आहे. चोरट्या बुटात ठेवलेली चावी घेऊन फ्लॅट उघडून चार तोळे सोन्याचे दागिने व 45 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.

याबाबत सूरज कांबळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रणिती कॉम्प्लेक्स मधील चौथ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये राहतात. दोघेही कंपनीत कामाला असल्याने बाहेर जाताना फ्लॅटची चावी बुटात ठेवून जातात. चोरट्याने याचा फायदा घेऊन शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बुटातील चावी घेतली. त्या चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्याने सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण साडे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. (Lonikand Pune Crime)

कॉम्प्लेक्समध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये एक अनोळखी तरुण त्यावेळी दिसत आहे.
त्याने तोंडाला रुमाल बांधल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याने तोंडावरील रुमाल काढल्याचेही दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
तसेच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्याचा तपास सुरु केला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त