Lonikand Pune Crime | पुणे : बांधकाम सुरु करण्यावरुन मारहाण, मुलांना चिरडून मारण्याची धमकी, 9 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lonikand Pune Crime | प्लॉट विकसित करण्यासाठी भूमीपूजन करत असताना नऊ जणांच्या टोळक्याने दमदाटी करुन मारहाण केली. तसेच जागेच्या मालकाला धमकी देऊन मुलांना गाडीने चिरडून मारुन टाकण्याची धमकी दिल्या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.17) सकाळी पावणे अकराच्या सुमारास केसनंद (Kesnand Pune) येथील न्युऑन मिडोज हौसिंग सोसायटी मध्ये घडला आहे.

याबाबत चैतन्य दिलीप सातव (वय-25 रा. बाईफ रोड, वाघोली ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महेश गोरख सातव (वय-38), कुशाल गोरख सातव (वय-33), विशाल गोरख सातव (वय-30), नाना हारगुडे (वय-40) सुशांत हारगुडे (वय-27 सर्व रा. केसनंद) यांच्यासह इतर चार साथीदारांवर आयपीसी 143, 147,149, 324,323, 352, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैतन्य सातव प्लॉट विकसित करण्यासाठी भूमीपूजन करत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. या भागात कन्स्ट्रक्शनची कामे आमच्या शिवाय कोणीच करीत नाही. तुम्ही कसे काय काम सुरु केले? अशी विचारणा करुन शिवीगाळ केली. तसेच बांधकाम साईटवर पडलेल्या बांबून मारहाण केली. आरोपी विशाल याने दगडाने मारहाण करुन जखमी केले.

भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या रोहित शिंदे व सागर सातव यांना देखील शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
आरोपी विशाल याने तेथून जाताना गाडीतून कोयता आणून तुला मारुन टाकतो अशी धमकी फिर्यादी यांना दिली.
तसेच जागेचे मालक दत्तात्रय कुडके यांना तुम्ही या जागेत घर कसे बांधता अशी धमकी दिली.
त्यावेळी कुकडे यांच्या पत्नीने मध्यस्थी केली असता विशाल सातव याने तुला आणि
तुझ्या मुलांना गाडीने चिरडून टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Pune Murder Case | बारामती : सिनेमा स्टाईल्सने कोयता व कुऱ्हाडीने वार करुन महाविद्यालयीन तरुणाचा निर्घूण खून

Sunetra Ajit Pawar | सुनेत्रा पवारांच्या नावे 58 कोटीपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता, साडेबारा कोटींची जंगम मालमत्ता, पाहा संपूर्ण तपशील

Balasaheb Thorat Meets Aba Bagul | आबा बागूलांची बाळासाहेब थोरातांकडून मनधरणी, पक्ष सोडून जाऊ नका…