Lonikand Pune Crime | पुणे : विवाहितेला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज करुन बदनामी करण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lonikand Pune Crime | इन्स्टाग्रामवर रिल (Instagram Reels) पाहत असताना एका विवाहित महिलेला अश्लील मेसेज (Obscene Messages) करुन बदनामी (Defamation) करण्याची धमकी दिली. याप्रकरणी इन्स्टाग्राम अकाउंट धारकावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणीकंद येथे राहणाऱ्या महिलेने सोमवारी (दि.22) लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.(Lonikand Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मोबाईलवर इन्स्टाग्रामवर रिल पाहत होते. त्यावेळी सुरुवातीला आरोपीने मेसेज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने अश्लील मेसेज करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तुझे फोटो व कॉल रेक़र्डींग माझ्याकडे आहे. मी ते तुझ्या पतीला पाठवून बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कुत्रे भुंकल्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

वडगाव शेरी (Vadgaon Sheri) : कुत्रे भुंकत असल्याच्या कारणावरुन तीन जणांनी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण करत गैरवर्तन केले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) तीन जणांवर विनयभंगासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथे सोमवारी (दि.22) रात्री अकराच्या सुमारास घडला आहे.

याबाबत 30 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन विपुल ओहाळ व त्याच्या आई-वडिलांवर आयपीसी 354, 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील कुत्रे भुंकत असल्याच्या कारणावरुन आरोपींनी वाद घातला.
आरोपी विपुल ओहाळ याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच इतर आरोपींनी बांबु, फावडे व खुरप्यासारख्या हत्याऱ्याने फिर्यादी, भाऊ, सासरे व दिर यांना मारहाण करुन जखमी केले. तसेच लोकांसमोर महिलेसोबत गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

Pune Fraud Case | पुणे: आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, आरोपीला जामीन मंजूर

Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ACB Trap Case | पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | आदित्य ठाकरे आज मावळमध्ये, संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज, म्हणाले ”महागाईने त्रस्त जनता…”