Lonikand Pune Crime | ‘तुला पिक्चर दाखवतो टॉयलेटमध्ये चल…’ 10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; पुण्यातील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lonikand Pune Crime | पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील वाघोली (Wagholi) येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित मुलाच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याबाबत कोणाला काही सांगायचे नाही अशी धमकी आरोपीने पीडित मुलाला दिली.(Lonikand Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 10 वर्षाचा मुलगा वाघोली परिसरातील एका नामांकित शाळेत शिकतो. 19 एप्रिल रोजी फिर्यादी यांनी मुलाला सकाळी सात वाजता शाळेत सोडले. त्यानंतर आरोपीने पिडीत मुलाला त्याचे नाव विचारले. त्याच्यासोबत गोड बोलून ‘तू मुव्ही बघतो की नाही’ अशी विचारणा केली. मुलाने हो असे उत्तर दिल्यानंतर आरोपीने ‘मी तुला एक फिल्म दाखवतो टॉयलेटमध्ये चल’ असे म्हटले.

त्यावेळी मुलाने त्याला नकार दिला. मात्र, आरोपीने ‘इथले सर्व कॅमेरे बंद आहेत, तू काळजी करु नकोस कोणाला काही समजणार नाही’ असं सांगितलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागला. तेव्हा पिडीत मुलाने त्याच्या तावडीतून आपली सुटका करुन घेत तेथून पळून गेला व क्लासमध्ये जाऊन बसला.

काही वेळाने आरोपी पुन्हा वर्गात आला. ‘तुला टॉयलेटमध्ये यायचे नाही तर तुला इथेच फिल्म दाखवतो’ असे बोलून
त्याने खिशातून मोबाईल काढला.मोबाईल मध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली त्यावेळी पीडित मुलाने मोठ्याने आरडा ओरडा
करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपीने कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली.
पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : प्रेमसंबंधातून महिलेचा खून, आरोपीला काही तासात गुन्हे शाखेकडून अटक (Video)

Health Insurance | मोठा निर्णय! आता हेल्थ इन्श्युरन्ससाठी नाही वयाचे बंधन, आजारी व्यक्तीही घेऊ शकतात विमा, 65 वर्षांची वयोमर्यादा हटवली