लैंगिक अत्याचार करणार्‍याला लोणीकंद पोलिसांकडून अटक

थेऊर : पोलिसनामा –  गेली सात महिन्यापासून फरार असलेला बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत हवा असलेल्या गुन्हेगारास लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका दहा वर्षीय मुलास केक खान्याचे आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यावर बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत नोव्हेंबर 2019 मध्ये लोणीकंद पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला यावर पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन यावर तपास करण्याच्या सूचना दिल्या.
दि.8 ऑगस्ट रोजी पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे पोलिस काॅन्स्टेबल ॠषीकेश व्यवहारे यांना या गुन्ह्यातील गुन्हेगार पिंपरी सांडस येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पिंपरी सांडस गावाभोवती तसेच वाडे बोल्हाई – आष्टापूर व पेरणे – डोंगरगाव रस्त्यावर वेगवेगळे पथक तयार करुन सापळा रचला व त्यात हा गुन्हेगार जेरबंद केला त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील व हवेलीच्या विभागीय पोलिस अधिकारी डाॅ सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलिस नाईक श्रीमंत होनमाणे, पोलिस काॅन्स्टेबल संतोष मारकड, दत्तात्रय काळे, समीर पिलाने, ॠषीकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांच्या पथकाने केली.