टेम्पो चोरीस गेल्याचा बनाव करणाऱ्यास लोणीकंद पोलिसांनी केले गजाआड

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – केसनंद येथे उभा असलेला टेम्पो ट्रक चोरीला गेल्याचा बनाव करून पोलिसांची दिशा भुल करणाऱ्या एका व्यक्तीला लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक करून त्यांचेकडून टेम्पो ताब्यात घेतला आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद शर्मा वय 33 वर्षे रा. शरदनगर, धार, मध्य प्रदेश यांनी तक्रार दिली की, दिनांक 15/04/2021 रोजी सकाळी 08/00 वा मॅनेजर निलेश कारपेंटर यांनी कळविले की, टेम्पो क्र MP 41GA0721 हा वाघोली येथे घेऊन ये काही भाडे आल्यास मी कळवतो असे सांगितल्यावर फिर्यादी याने सदर टेम्पो इंदापूर येथून वाघोली येथे घेऊन आले.

त्यानंतर टेम्पो केसनंद कडे जाणाऱ्या रोडचे बाजूला लावून सदर टेम्पो चे केबिन मधे जेवण करून झोपी गेले. दिनांक 16/04/2021 रोजी पहाटे 5/00 वा टेम्पो लॉक करून टॉयलेटला गेलो. आल्यानंतर पाहिले असता टेम्पो सदर ठिकाणी नव्हता. वगैरे मजकूर वरून गुन्हा दाखल होता. तपास पथकास गुह्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. तक्रारदार व त्याचा मॅनेजर यांचेकडे बारकाईने चौकशी केल्यावर वाघोली परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता अश्या प्रकारे कोणतीही गाडी केसनंद फाटा येथे आली नसलयाचे समजले. म्हणून या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी तपास पथकाचे वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याचे तपासाचे आदेश दिले.

यावर दिनांक १७/०४/२०२१ रोजी पहाटे ०२/०० वाजता च्या सुमारास तपास पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना पुणे – सोलापूर महामार्गावर एच पी पेट्रोलपंप जवळ, रस्त्याच्या कडेला गुन्ह्यातील टेम्पो लावलेला दिसल्याने तो ताब्यात घेतला. परंतु हा टेम्पो कुठेही सी सी टी व्ही फुटेज मधे आला नसल्याने तसेच तक्रारदार याने सांगितलेल्या माहितीमध्ये तफावत येत असल्याने हरीश शर्मा याचे विरुद्ध संशय बळावला. म्हणून त्यास अटक करण्यात आले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचेकडून गुन्ह्यातील रु. ३,००,००० किंमतीचा टाटा कंपनीचा आईचेर टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी नामदेव चव्हाण (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर), पंकज देशमुख (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४), किशोर जाधव (सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप मानकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), विनायक वेताळ ( पोलीस निरीक्षक- गुन्हे) यांनी तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, पोलीस उपनिरीक्षक किरण वराळ, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सागर कडू यांनी केली आहे.