‘नागरिकत्व’ विधेयकावर शिवसेनाच्या राज्यसभेतील ‘भूमिके’कडे ‘लक्ष’, भाजपा मात्र ‘निर्धास्त’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लोकसभेत नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत पाठिंबा नाही असे सांगितले. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसच्या इशाऱ्यामुळे भुमिका बदलल्याची टिका केली जात आहे. नागरिकत्व विधेयक आज राज्यसभेत येणार असून त्यावर ६ तास चर्चा होणार आहे. त्यानंतर ते विधेयक मंजूरीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. लोकसभेत हे विधेयक ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर करण्यात आले आहे.

शिवसेनेचा विरोध असला व जद युमध्ये मतभेद असले तरी राज्यसभेत हे विधेयक पास होईल, याविषयी भाजपाला विश्वास आहे. सध्या राज्यसभेत भाजपाचे ८३, जद यु चे ६, अकाली दलाचे ३ तसेच लोजपा, आरपीआई, ए के एक याचा १ आणि ११ नियुक्त खासदार भाजपाच्या बाजूला आहे. अन्ना द्रमुकबरोबर चर्चा सुरु असून त्यांचे ११ खासदार आहेत. बीजद चे ७ खासदार, वाईएस आर काँग्रेस २ आणि तेलगु देशमचे २ सदस्य आहेत. या सर्वांचे समर्थन मिळेल असा भाजपाला विश्वास आहे. त्यांच्या जोरावर भाजपा विश्वासमतापेक्षा अधिक १२० मते मिळवून विधेयक संमत होईल, असे वाटत आहे.

विरोधकांकडे काँग्रेस ४६, तृणमुल काँग्रेस १३, बसपा ४, सपा ९, द्रमुक ५, राजद ४, डावे पक्ष ६, राष्ट्रवादी काँग्रेस ४ व इतर असे ९७ खासदार आहेत. त्यांना शिवसेना, आप आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिला तरी त्यांचा आकडा ११० पर्यंतच पोहचत आहे. त्यामुळेच भाजपा निर्धास्त झाला आहे.
शरद पवार काय करणार

कलम ३७० सह अनेक महत्वांच्या विधेयकांवर राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी एक तर सभात्याग केला किंवा सभागृहात अनुपस्थित राहून एक प्रकारे राज्यसभेत सरकारला मदतच केली होती. ३७० कलम रद्द करण्याविरुद्ध बाहेर टिका करणारे शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार राज्यसभेत मात्र अनुपस्थित होते. त्यामुळे सरकारला हे विधेयक मंजूर करुन घेण्यास अडचण आली नाही.

नागरिकत्व विधेयकावर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधात मतदान केले आहे. तशीच भूमिका राज्यसभेत ठेवणार का की मागील वेळेप्रमाणे यावेळीही शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित राहून किंवा तटस्थ राहून मोदी सरकारला मदत करणार की विरोधात मतदान करणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like