PM मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीवरून चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांवर निशाणा, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणेकरांचा स्वभाव आणि त्यांच्या सवयीमुळे पुणेकरांची वेगळीच ओळख आहे. त्यात दुपारी 1 ते 4 यावेळेत वामकुशी घेण्याची बऱ्याच पुणेकरांच्या सवयीचा भाग आहे. त्यावरुन बरीच टीका टिपण्णी देखील होत असते. मात्र, आता याच कार्यपद्धतीवर बोट ठेवत भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra modi) बघा ते दिवसभरातले 22 – 22 तास काम (work) करतात, अशा शब्दात पुणेकरांवर (pune citizens) निशाणा (target) साधला आहे.

पिंपळे सौदागर येथे भाजपा आमदारांचा कौतुक सोहळा शनिवारी (दि .24) पार पडला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी उपस्थित भाजपा आमदार-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला भाजपाचे दीडशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान फिजिकल डिस्टनसचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी मास्क परिधान केले नव्हते. एवढेच नाही तर नेते देखील विना मास्क व्यासपीठावर बसले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधानांकडू अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचे कदापि चिंता करत नाही व त्याला प्रत्युत्तर देखील देत बसत नाही. मोदी कधीही टीकेने विचलित होत नाहीत. ते फक्त प्रामाणिकपणे आपले काम करत राहतात. त्यांच्यावर झालेल्या कितीही टोकाच्या टीकेला ते संयमाने सामोरे जातात. कितीतरी वर्षांनी देशाला आणि जगाला असे व्यक्तिमत्व मिळाले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावरुन देखील काही जणांनी टीका केली. मात्र, मोदींनी यावर कोणतेही आक्रमक भाष्य न करता भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीले.

त्यांचे धाबे दणाणले
दुष्काळ पाहणी दौऱ्यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी कार्यक्रम सुरु असताना धडकली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात अनेक कार्यकर्ते आणि नेते आले होते. या सर्वांचे धाबे दणाणले आहेत.