कामाची गोष्ट ! नोकरी शोधताय ‘नो-टेन्शन’, आता Google करणार मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात सर्वाधिक चालले जाणारे सर्च इंजिन म्हणजे गुगल. भारतात देखील गुगलचा वापर सर्वाधिक केला जातो. मात्र आता भारतीय तरुणांना गुगलचा आणखी एक मोठा फायदा होणार आहे. गुगलने भारतीय तरुणांना आता नोकरी देण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. यासाठी गुगल पे चा आधार घेतला असून याद्वारे तरुणांना नोकऱ्या मिळण्यास मदत होणार आहे.
यासाठी गुगलने गुगल पे ची मदत घेतली असून गुगलने काल गुगल फॉर इंडिया 2019 कार्यक्रमात याची घोषणा केली. त्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांना आणि तरुणांना नोकरी सापडण्यास मदत होणार आहे.

गुगल पे च्या आधारे तरुण अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये विविध पर्याय दिले जाणार असून तुमच्या शिक्षण आणि अनुभवानुसार तुम्हाला नोकरी सापडण्यास मदत होणार आहे. यासाठी गुगलने 24 सेव्हन, स्विगी, डुंजो यांसारख्या कंपन्यांना एकत्र आणले असून भविष्यात यांच्याद्वारे नोकऱ्या तयार होण्यास मदत होणार आहे. या सर्व अर्ज करणाऱ्यांचे स्पॉट कार्डही तयार होते. त्यामुळे तुम्हाला उपयुक्त नोकऱ्या सापडण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील यावेळी भारताला डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याचे लक्ष्य असल्याचे म्हटले. यामध्ये विविध प्रकारच्या सेवांचा समावेश असणार आहे. देय सेवा, इंटरनेट ऑफ थिंग्स, ई-कॉमर्स, मशिन लर्निंग यांसारख्या सुविधांचा यामध्ये समावेश असणार आहे. तसेच गुगलवर आता यापुढे हिंदी आणि इंग्रजीप्रमाणेच भारतीय भाषांमध्ये देखील माहिती मिळवता येणार आहे.

Visit – policenama.com