छातीत ‘गोळी’ लागल्याने ‘रक्ताच्या’ थारोळ्यातील तरुण मागत होता ‘मदत’, ‘लोक’ त्याचा ‘व्हिडिओ’ काढण्यात व्यस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लिफ्ट दिली नाही या कारणाने काही माथेफिरुंनी एका तरुणाला गोळी घातली आणि बाइक घेऊन ते फरार झाले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाने पोलिसांना आणि घरच्यांना संपर्क साधला, यावेळी तो म्हणत होता, वडीलांना सांगा मी आता वाचू शकत नाही. त्या भागातील काही लोकांनी या तरुणांला रुग्णालयात दाखल केले.
Uttarpradesh
ही घटना उत्तरप्रदेशाच्या प्रतापगढ मध्ये घडली. जौनपूरला राहणारा सुनील कुमार आपल्या आत्याला प्रतापगढला सोडून परतत होता, तेव्हा रस्त्यात काही तरुणांनी त्याला लिफ्ट मागितली. सुनीलने यांना लिफ्ट देण्यास नकार दिल्याने या माथेफिरुंच्या टोळीने सुनीलवर गोळी झाडली, गोळी छातीच्या आरपार गेली, त्यांनी पुन्हा एकदा सुनीलवर गोळीची एक फेरी झाडली परंतू पिस्तुलात गोळी नव्हती. त्यानंतर ही टोळी बाइक घेऊन फरार झाली.
Uttarpradesh
रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या या तरुणांना अनेकांना मदत मागितली परंतू लोक त्याला पाहून हिंमत करत नव्हते. अर्धा तास तो मोठ्या मोठ्याने ओरडून लोकांना मदतीसाठी विनावणी करत होता. परंतू लोकांनी त्याला मदत करण्याऐवजी त्याचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली.
Uttarpradesh
सुनीलने सांगितले की एक महिला तेथून जात होती तेव्हा तिने तिचा फोन देऊन घरच्यांना संपर्क साधण्यास सांगितले आणि काही लोकांना त्याच महिलेने मदतीसाठी बोलवले. सुनीलच्या छातीवर कापड बांधून वाहणारे रक्त रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत होता आणि घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. सुनीलने सांगितले की लोक मोबाइलमध्ये व्हिडिओ काढत होते. तो लोकांना म्हणत होता की व्हिडिओ न काढता मला मदत करा, परंतू कोणीही त्याचे ऐकले नाही.
Uttarpardesh
या प्रकरणी डीआयजी के. पी. सिंह यांनी हळहळ व्यक्त केली ते म्हणाले की लोकांनी त्याला लवकर रुग्णालयात पोहचवले असते तर त्याचे लवकर उपचार करता आले असते. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत आणि पोलीस फरार आरोपींच्या शोधात आहेत.

Visit : Policenama.com