पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठांना लुटणार्‍यांना पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्यात रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट ४ च्या पथकाने अटक केली आहे.

शौकत खान जमान इराणी (वय ४८, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शौकत खान जमान इराणी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

काय घडलं होतं ?
साताऱ्यातील शाहूपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाणिज्य महाविद्यालयासमोर एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दोन जणांनी रस्त्यात अडवले. त्यानंतर आपण पोलीस असल्याची बतावणी करून पुढे चोऱ्या होत आहेत. तुमच्या हातातील अंगठी आणि गळ्यातील सोनसाखळी काढून रुमालात ठेवा असे सांगितले. त्यानंतर त्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी अंगठी आणि सोन्याची साखळी काढून दिली. त्यानंतर ती रुमालात बांधण्याचा बहाणा करत ती सोनसाखळी आणि अंगठी काढून घेत तेथून पसार झाले होते. त्यानंतर शाहूपूरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेने केली अटक
पुण्यातील गुन्हे शाखेच्या युनीट ४ चे कर्मचारी राजू मचे यांनी या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज मिळविले होते. त्यानंतर अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजीनगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले. त्यावेळी रेकॉर्डवरील ४७ गुन्हेगार पोलिसांनी तपासले. त्यादरम्यान सातारा येथील सीसीटिव्हीतील आरोपीच्या वर्णनाप्रमाणे मिळताजुळता एकजण तेथे असल्याची माहिती राजू मचे यांना मिळाली. त्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवून ताब्यात घेण्यात आले. त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, कर्मचारी शंकर पाटील, राजू मचे, गणेश काळे, सचिन ढवळे, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,