looted youth in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कामावर जाणाऱ्या व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी अडवून शस्त्राचा धाक दाखवून खिशातील 2 हजार रुपये काढून नेल्याची (looted youth in Katraj) घटना कात्रज येथे घडली आहे. यावेळी नागरिक जमा झाल्यानंतर त्यांना देखील या चोरट्यांनी धमकावले. तर दुकानदारांना दुकाने बंद करण्यास लावत दहशत निर्माण केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी संजय शेडगे (वय 51, रा. शेलारमळा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस (Bharati Vidyapeeth police) ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार दुचाकीवरील दोघा अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गेल्या 7 वर्षापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हे गोकूळनगर येथील खासगी कंपनीत नोकरी करतात.
ते रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यास निघाले होते.
यावेळी कात्रज कोंढवा रस्त्यावरील (Katraj Kondhwa Road) माऊली कमानीजवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याना अडविले.
त्यांना शस्त्र दाखवून धमकावले आणि त्यांच्या खिशातून 1 हजार 900 रुपये काढून घेतले (looted youth in Katraj).
तर यावेळी नागरीक जमा झाल्यानंतर त्यांना धमकावले व परिसरात मोठमोठ्याने शिवीगाळ करत दुकाने बंद करण्यास भाग पाडून दहशत पसरवली.
त्यानंतर हे आरोपी तेथून पसार झाले आहेत.
अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

Web Title : looted youth in Katraj area

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

woman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

three dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले 3 मृतदेह