5000 साठी नवरी बनून तिनं केला असा ‘ड्रामा’, लग्नानंतर दोनच तासात उघडकीस आला ‘कारनामा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आग्रा येथे लुटमारीची एक अनोखी घटना घडली आहे. जी ऐकून तुम्हीदेखील चकित व्हाल. येथील एका व्यापाऱ्याने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले. मात्र लग्नानंतर दोनच तासानंतर नववधूने असे कृत्य केले ज्यामुळे सासरच्या लोक हादरून गेले. तिने अन्नामध्ये बेशुद्धीचे औषध मिसळुन व्यापारी नवरा आणि त्याच्या तीन मुलींना खायला दिले. ते सर्व बेशुद्ध पडल्यानंतर तिने सामान घेऊन पोबारा केला.

थोड्या वेळाने, व्यावसायिकाने लुटीची जाणीव झाल्यावर तिला शोधायला सुरवात केली. तेव्हा ती जवळील पॉवर स्टेशनवर सापडली. या कृत्यात तिच्याबरोबर सामील दोन महिला, मध्यस्थ आणि तरूण पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर रकाबगंज पोलिस स्टेशन येथे तक्रार करून आरोपी मुलीला तुरूंगात पाठविण्यात आले.

असे घडले प्रकरण :
यमुना पुलावरील सुशील नगर येथे राहणारे सरवन सिंग घराच्या जवळ किराणा दुकान चालवितात. त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यांना तीन मुली असून धाकटी मुलगी दोन वर्षाची आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी कोणी नाही. आपल्या मुलीचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी लग्नाचा विचार केला. या कुटुंबाचा परिचय डौकी येथे राहणाऱ्या देवकी नंदन यांच्याशी होता. त्यांच्या माध्यमातून बहर येथे राहणाऱ्या प्रीतीशी दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी सांगितले की प्रीतीच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि ती मुरैनाची रहिवासी आहे.

५ ऑक्टोबरला प्रीती देवकी नंदन, दोन महिला आणि एक तरुण यांच्यासमवेत आली. देवकी नंदन यांनी यातील एक महिला प्रीतीची आई तर दुसरी बहिण असल्याची बतावणी केली. तरूणाची ओळख भावाच्या स्वरूपात करून दिली. यानंतर त्यांनी ५० हजार रुपये खर्चाची मागणी केली. सारावनन यांनीही ती रक्कम दिली. त्यानंतर या दोघांच्या लग्नाचा विधी पार पडला. यानंतर प्रीती आणि एका महिलेने जेवण बनवले. सरवण आणि त्याची मुले जेवल्यानंतर बेशुद्ध झाले. थोड्या वेळाने जागे झाल्यानंतर प्रीती, देवकी नंदन व इतर फरार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पॉवरहाऊस जवळ पकडले :
घरात ठेवलेले पैसे आणि दागिनेही चोरीला गेले होते. सरवणच्या कुटुंबीयांनी आरोपीचा शोध सुरू केला. प्रीती पॉवर हाऊसजवळ उभी असलेली आढळली. कुटुंबातील सदस्यांनी तिला पकडून पोलिस स्टेशन रकाबगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिस चौकशीत आरोपी प्रितीने फरार साथीदार प्रमोद, वर्षा आणि शालू यांची नावे पोलिसांना दिली. पाच हजार रुपये घेऊन वधू झाल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सोमवारी प्रीतीला तुरुंगात पाठविण्यात आले.

आरोपी स्त्रीची कहाणी :
आरोपी प्रीतीने पोलिसांना सांगितले की तिला चार भाऊ आहेत. दोघे दिल्लीत आणि दोन मुंबईत राहतात. आई मरण पावली आहे. वडील जरारमध्ये रहात असून ती ताजगंजमध्ये राहते. तिचे लग्न जवळजवळ नऊ वर्षांपूर्वी झाले असून तिला मुले नाहीत. दोन वर्षांपूर्वी पतीशी झालेल्या वादानंतर त्याने तिला सोडले. त्यानंतर तिने नौलखा येथील वर्षाच्या मोहिनी पार्लरमध्ये काम करण्यास सुरवात केली. याठिकाणी तिला शालू भेटायला यायचा. शालूने देवकी नंदनची ओळख करून दिली. काही दिवसांपूर्वी त्याने पाच हजार रुपयांची लालूच देऊन संबंधित व्यक्तीशी लग्नानंतर चोरी करण्याच्या प्लॅन मध्ये सामील करून घेतले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like