Photos : ‘लोपामुद्रा’ राऊतनं ‘बोल्ड’ बिकिनी घालून बर्फात केलं फोटोशुट ! ‘हॉट’ अवतार पाहून चाहते म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस सीजन 10 मधील सर्वात हॉट स्पर्धक म्हणून ओळखली जाणारी फेमस मॉडेल लोपामुद्रा राऊत (Lopamudra Raut) सोशल मीडियावर खूपच ॲक्टीव असते. अनेकदा आपल्या हॉटनेसमुळं आणि बोल्ड लुकमुळं चर्चेत येताना दिसत असते. हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असते. पुन्हा एकदा लोपामुद्रा चर्चेत आली आहे. तिनं आपल्या लुकनं सोशलवर धुमाकूळ घातला आहे.

लोपामुद्रानं तिच्या इंस्टारून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती नेहमीप्रमाणे बोल्ड आणि हॉट अवतारात दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पिंक कलरची बिकिनी घातली आहे. बिकिनी घालून ती बर्फात काही पोज देताना दिसत आहे. तिच्या हातात कॉफीचा मग आणि डोक्यावर कॅपही आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.

लोपामुद्राचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. कोणी तिला बोल्ड म्हणत आहे विचारत आहे तुला वेड लागलंय का.

लोपामुद्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती एक मॉडेल आहे. 2016 साली ती बिग बॉस सीजन 10 मध्ये झळकली आहे. शोमधील सर्वात हॉट स्पर्धक म्हणून ती ओळखली जाते. बिग बॉसच्या घरातही लोपामुद्राच्या स्टाईल आणि कपड्यांची खूपच चर्चा झाली होती. शोमध्येही तिचा बोल्ड अवतार पहायला मिळाला होता. 2017 साली ती खतरों के खिलाडी सीजन 8 मध्ये दिसली होती. शोच्या सेमी फायनलमध्ये ती पोहोचली होती. लोपामुद्रानं देशातील अनेक ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आहे. ती मिस युनायटेड कॉन्टिनेंट्स 2016 मध्ये सेकंड रनरअप राहिली आहे. यासाठी तिला क्राऊनही मिळाला होता. 2013 मधील गोव्यातील फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही तिनं भाग घेतला होता. यात ती फर्स्ट रनरअप होती.