२०० किलोचा ‘आमरस’ पिल्याने देव ‘आजारी’, वैद्यांनी देवाला दिला १५ दिवस ‘बेड रेस्ट’ घेण्याचा ‘सल्‍ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानात एक अचंबित करणारी घटना घडली आहे. राजस्थानातील कोटा जिल्ह्यातील एका मंदिरातील देव देखील उष्णतेने बेहाल झाले आहेत. यामुळे वैद्यांनी त्यांची तपासणी करुन देवाला बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे. यामुळे मंदिर 23 जून पर्यंत बंद करण्यात आले आहे. जेणेकरुन देवाची लवकर तब्येत सुधारेल.

200 किलोचा आंबा रस खाल्याने देव आजारी –

हे प्रकरण कोटा येथील रामपुरा येथील प्राचीन जगदीश मंदिरातील आहे. या मंदिरात 7 जूनला तेथील देव जगन्नाथ, सुभद्रा आणि बळीभद्र यांना 200 किलोचा आम रस नैवेद्य म्हणून देण्यात आला होता. परिणाम हा झाला की, एवढा आमरस खाल्याने देवाची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे अखेर वैद्याला बोलवण्यात आले. त्यांनी देवाच्या नाडीची तपासणी करुन देवाला लवंग आणि तुळशी देऊन उपाय सुरु केला आहे.

वैद्यांनी देवाच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी कमीत कमी 15 दिवसांचा अवधी लागेल. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले असून आवाज होऊ नये यासाठी घंट्यांना कापड बांधण्यात आले आहे.

आता वैद्य रोज मंदिरात येऊन देवाच्या तब्येतीची तपासणी करत आहेत. तसेच मंदिर प्रशासनाने भक्तांना देवाचे दर्शन घेताना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रोज औषधात तुळशी, लवंग आणि मीरी नैवेद्यात देण्यात येत आहे. देवाच्या उपचाराची प्रक्रिया 15 दिवस तरी चालेल असे सांगण्यात आले आहे.

सिने जगत –
शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

सलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर