PAK मध्ये सापडलं हिंदू राजानं बनवलेलं भगवान विष्णचं 1300 वर्षे जुनं मंदिर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात सुमारे 1300 वर्षांपूर्वी बांधलेल्या हिंदू मंदिराचे अवशेष सापडले आहेत. भगवान विष्णूच्या मंदिराचे हे अवशेष पश्चिम पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका डोंगरावर खोदकामादरम्यान आढळले आहे.

1,300 वर्षांपूर्वी बांधलेल्या हिंदू मंदिराचा शोध पाकिस्तानी आणि इटालियन पुरातत्त्व तज्ज्ञांनी स्वात जिल्ह्यातील डोंगरावर लावला आहे. गुरुवारी या शोधाची घोषणा करताना पुरा तत्त्व विभाग खैबर पख्तूनख्वाचे अधिकारी फजले खलीक म्हणाले की, सापडलेले मंदिर भगवान विष्णूचे आहे. ते म्हणाले की, हिंदू राजवटीच्या काळात हे हिंदूंनी 1,300 वर्षांपूर्वी बांधले होते.

हिंदू शहा किंवा काबुल शाहिस (850 1026 इ. स.) हा हिंदू राजवंश होता ज्याने काबुल खोरे (पूर्व अफगाणिस्तान), गांधारा (आधुनिक पाकिस्तान-अफगाणिस्तान) आणि वायव्य भारत यावर राज्य केले. खोदकामादरम्यान पुरा तत्त्व शास्त्रज्ञांनी मंदिराच्या जागेजवळ छावनी आणि प्रहरीचे निशाण आढळले आहे. मंदिराशेजारी तज्ज्ञांना पाण्याची टाकीदेखील सापडली, ज्याच्याबद्दल त्यांचे मत आहे की, याचा वापर पूजेच्या आधी केला जात होता.

फजले खलीक म्हणाले की, स्वात जिल्हा एक हजार वर्षांहून अधिक पुरातन वास्तूंचे निवासस्थान आहे आणि पहिल्यांदाच या भागात हिंदू शाही काळाचा पुरावा सापडला आहे. इटालियन पुरातत्त्व मिशनचे प्रमुख डॉ. लुका म्हणाले की, घाघरा संस्कृतीचे हे पहिले मंदिर आहे जे स्वाहिली जिल्ह्यात सापडले आहे. अनेक बौद्ध धर्मस्थळेही स्वात जिल्ह्यात आहेत.

You might also like