Loss Belly Fat | ‘या’ आहेत त्या 5 गोष्टी ज्या फॉलो केल्याने कमी होईल वजन, गायब होईल पोटाची चरबी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Loss Belly Fat | झपाट्याने बदलणार्‍या जीवनशैलीमुळे लहान मुलांसह तरुणांमध्येही पोटाच्या चरबीची समस्या दिसू लागली आहे. पोटाची वाढलेली चरबी कुणालाही अडचणीत आणण्यासाठी पुरेशी असते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण पोटाची चरबी (Belly Fat) वाढल्याने तुमचे सौंदर्य तर कमी होतेच, पण त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही खूप त्रास होतो. त्यामुळे जर तुम्हीही पोटाच्या या चरबीने हैराण असाल आणि ती कमी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. (Loss Belly Fat)

 

पोटाची चरबी कमी करणे का आवश्यक
वेळेत वजन आणि पोटाची चरबी कमी करणे खूप आवश्यक आहे. कारण पोटाची चरबी वाढल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. या समस्येचे कारण थेट आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीशी संबंधित आहे.

 

काय म्हणतात तज्ञ
आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, बहुतेक लोक पोटाच्या चरबीमुळे त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी ते डाएटिंग आणि व्यायामाचा घरगुती उपाय करतात. पण तुम्हाला माहित आहे का की पोटाची चरबी 5 सोप्या पद्धतींनी कमी केली जाऊ शकते. त्यांच्याबद्दल खाली जाणून घ्या… (Loss Belly Fat)

 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी या 5 गोष्टी फॉलो करा (Follow these 5 things to reduce belly fat)

1. या गोष्टींपासून दूर राहा
पोटाची चरबी कमी करायची असेल तर साखर आणि साखरयुक्त पेयांपासून (Sugar, Sugary Drinks) अंतर ठेवा. मेटाबोलिक हेल्थसाठी अ‍ॅडेड शुगर अत्यंत हानिकारक असल्याचे अनेक अभ्यासांतून समोर आले आहे.

2. अधिक प्रोटीन खा
जर तुम्हाला पोटाच्या चरबीचा त्रास होत असेल तर तुमच्या रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा. जास्त प्रमाणात प्रोटीनचे (Protein) सेवन केल्याने सतत खाण्याची इच्छाही खूप कमी होते आणि पोट सतत भरलेले वाटते.

 

3. दररोज व्यायाम करा
सहसा आपण डाएटिंग (Dieting) करतो पण व्यायाम (Exercise) करत नाही, पण जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुमच्या रोजच्या दिनचर्येत पोटाच्या व्यायामाचा अवश्य समावेश करा.

 

4. कमी कार्बोहायड्रेट खा
पोटाची चरबी कमी करायची असेल तर कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खा. असे केल्याने पोटाची चरबी कमी होण्यासही खूप मदत होते.
लो-कार्बयुक्त आहार घेतल्यास त्याचा परिणाम शरीरावर लवकरच दिसून येतो.

 

5. फायबर युक्त अन्न खा
जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
मात्र, वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी कोणते फायबर (Fibre) महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.
यासाठी तुम्ही तुमच्या पोषणतज्ञांशी संपर्क साधावा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Loss Belly Fat | loss belly fat how to reduce belly fat follow these 5 things to reduce belly fat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crack Heels Remedies | घरीच बर्‍या करू शकता भेगा पडलेल्या टाचा, ‘या’ आहेत पद्धती

Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?

Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा