UIDAI नं सुरू केली नवी सुविधा ! ‘आधार’कार्ड हरवल्यास कुठही जाण्याची गरज नाही, 15 दिवसात येणार ‘घरपोच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर त्यासाठी आता तुम्हाला कोणतीही धडपड करण्याची आवश्यकता नाही. १५ दिवसात तुमचे आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहचू शकेल. कारण UIDAI ने आधार अ‍ॅपची नवीन आवृत्ती (New Version of Aadhaar App) लॉन्च केले आहे. या नव्या अ‍ॅप चे नाव आहे mAadhaar आहे. कोणतेही Android किंवा iOS वापरकर्ते सहजपणे हे अ‍ॅप डाउनलोड करू शकतात. हे अ‍ॅप Apple आणि अँड्रॉइड प्ले स्टोअर वरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते. या अ‍ॅपच्या मदतीने आपण सहजपणे आपल्या आधार रिप्रिंटची विनंती करू शकता. आधार रिप्रिंटसाठी तुम्हाला सेवा शुल्क म्हणून 50 रुपये द्यावे लागतील. आपल्या विनंतीनंतर ते 15 दिवसांच्या आत आपले आधार कार्ड वितरित केले जाईल. मात्र या वेळी आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की नवीन छापील आधारकार्ड केवळ नोंदणीकृत पत्त्यावर पाठविले जाईल.

नवीन अ‍ॅपवर मिळतील या सुविधा –

नवीन आधार अ‍ॅप वापरण्यास सुलभ आहे. या नवीन अ‍ॅपमध्ये तुम्ही ऑफलाइन केवायसी, क्यूआर कोड स्कॅन, ऑर्डर रीप्रिंट्स ऑर्डर करणे, पत्ते अपडेट करणे, आधार पडताळणी, ईमेल पडताळणी, यूआयडी पुनर्प्राप्तीसाठी विनंती यासारख्या गोष्टी सहज करू शकता. या अ‍ॅपद्वारे आपण बर्‍याच प्रकारच्या ऑनलाइन विनंत्यांची स्थिती सहजपणे तपासू शकता.

असे करा आपल्या मोबाईलवर mAadhaar अ‍ॅप इन्स्टॉल

1. Google किंवा Apple Play प्ले स्टोअर वर जा.
2. इन्स्टॉल बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती माहिती द्यावी लागेल.
3. यानंतर आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल केला जाईल.
4. यानंतर आपल्याला आपल्या अ‍ॅपमध्ये एक नवीन पासवर्ड सेट करावा लागेल.
5. हा पासवर्ड अ‍ॅपच्या प्रत्येक वापरापूर्वी वापरला जाणे आवश्यक आहे.
6. हा पासवर्ड 4 अंकांचा असेल

फेसबुक पेज लाईक करा –