‘आधार’कार्ड संबंधातील ‘ही’ पावती खूप कामाची, हरवल्यास होईल ‘मनस्ताप’ आणि वाढेल ‘टेन्शन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आणि उपयुक्त कागदपत्र समजले जाते. त्यामुळे आधार कार्ड हरवले तर आपण विचार करतो की आता नवे आधार कार्ड कसे मिळवता येईल. परंतू काळजी करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला परत नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. तुम्ही तुमच्या एनरॉलमेंट नंबर (EID) वरुन तुमच्या आधारकार्डची रिप्रिंट काढू शकतात. त्यासाठी तुम्हाला घरबसल्या फक्त UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल.

UID नंबर खुप महत्वाचा ठरतो जेंव्हा आधारकार्ड धारकाकडे त्यांचा आधार क्रमांक नसतो. EID 28 आकड्यांचा क्रमांक हा एक्नॉलेडमेंट स्लिपचे 14 अंक आणि एनरोलमेंटच्या 14 अंकांना मिळून बनलेला असतो. त्यामुळे आधारची एनरॉलमेंट स्लिप (Adhaar enrollment slip) तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे.

तुमचे आधार कार्ड हरवल्यास ही स्लिप तुमच्या कामी येते. त्या आधारे तुम्ही UIDAI च्या वेबसाइटवरुन आधार डाउनलोड करु शकतात. अनेकांना वाटते की ही एनरॉलमेंट स्लिप कामाची नाही, परंतू हीच स्लिप तुम्हाला तुमचे आधार कार्ड परत मिळवून देईल. ही स्लिप तेव्हा अत्यंत उपयुक्त ठरते जेव्हा आपल्याकडे 14 अंकी आधार क्रमांक नसतो. हा नंबर देखील तुम्ही हरवला असेल तर तुम्ही तो परत मिळवू शकतात, परंतू यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधारला लिंक हवा.

अशी आहे प्रक्रिया –

1. uidai.gov.in या वेबसाइटवर जाऊन आधार एनरॉलमेंट सेक्शनमध्ये ‘Retrieve Lost UID/EID’ पर्यायावर जाऊ शकतात.
2. त्यात तुम्हाला तुमचे नाव, आधार लिंक नंबर किंवा नोंदणी असलेला ईमेल आयडी आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.
3. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर किंवा ईमेलवर एक OTP येईल. तो तुम्हाला वेरिफाय करुन घ्यावा लागेल.
4. त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर किंवा ईमेलवर तुमचा एनरॉलमेंट नंबर तुम्हाला मिळेल.

कॉल करुन मिळवा एनरॉलमेंट स्लिप –
यासाठी तुम्हाला 1947 या क्रमांकावर कॉल करावा लागेल. त्यावर सांगण्यात येणारी प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमचा Adhaar Enrollment slip नंबर मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –