पैसे आणि कार्डने भरलेले पाकीट चोरी झाल्यावरही काळजी करण्याची नाही गरज, ‘ही’ पॉलिसी ठरणार वरदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपले पाकीट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. यात पैसे आणि सर्व क्रेडिट / डेबिट कार्ड, पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) यासारख्या महत्वाच्या कार्ड असतात, अश्या परिस्थिती ते चोरीला गेल्यास आपल्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण आता बाजारातही अशी पॉलिसी आली आहे, जी तुमची पर्स चोरी झाल्यास त्यात ठेवलेली सर्व महत्त्वाची कार्डे तुम्हाला विना शुल्क घरी पोहोचवली जातात. याशिवाय तुम्हाला झटपट रोख रक्कम देण्याचीही व्यवस्था केली जाते. वेगवेगळ्या कंपन्यांनी या पॉलिसीला आपआपली नावे दिली आहेत. आपण गुगलवर वॉलेट थेफ्ट पॉलिसी संदर्भात गुगवर सर्च केल्यास आपल्याला अनेक कंपन्यांची माहिती मिळेल.

अश्या प्रकारे मदत करते पॉलिसी
वन असिस्ट नावाच्या कंपनीने या पॉलिसीला वॉलेट असिस्ट एज असे नाव दिले आहे. या पॉलिसीसाठी कंपनी वार्षिक 1599 रुपये शुल्क घेते. हि पॉलिसी घेतल्यानंतर, जर तुमचे पॉकेट चोरी झाले असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या बँकांचे कार्ड ब्लॉक करण्यासाठी कोठेही कॉल करण्याची गरज भासणार नाही. आपल्याला बस कंपनीला कॉल करावा लागेल, त्यानंतर आपली सर्व बँकिंग संबंधित कार्डे बंद केली जातील. यासह, आपण अशा ठिकाणी असाल जेथे आपल्याकडे रोख रक्कम नसेल तर कंपनी त्या वेळी आपल्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंतची रोख व्यवस्था करेल. इतकेच नव्हे तर कंपनी हॉटेलचे बिल, ट्रेन किंवा विमानाच्या तिकिटांचीही व्यवस्था करेल, शिवाय कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुम्हाला हे पॉलिसीअंतर्गतही करता येईल.

घरी बसल्या मिळणार महत्वाची कार्डे
पोलिसांत पर्स चोरीच्या तक्रारीची प्रत कंपनीला दिल्यानंतर तुम्हाला नवीन कार्ड बनविण्यासाठी कुठल्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही किंवा कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. हे काम आपल्याला कंपनी पॉलिसीअंतर्गत विनामूल्य केले जाईल. सर्व कार्ड वेळोवेळी आपल्या घरी येतील.

एटीएम किंवा ऑनलाईन फसवणूक देखील होणार कव्हर
अनेक कंपन्या या योजनेद्वारे एटीएमच्या गैरवापराद्वारे पैसे काढणे किंवा ऑनलाइन फसवणूक किंवा डुप्लिकेट कार्ड बनवून फसवणूक देखील कव्हर करते. तसेच, मोबाइल चोरी होण्याच्या बाबतीत सेवा प्रदात्याचा नंबर शोधण्याची आवश्यकता नाही. कंपनीला माहिती दिल्यानंतरच कंपनी आपला नंबर त्वरित ब्लॉक करण्याची सुविधाही देत आहे.