तिकीट शोधायला गेला आणि सापडलं तब्बल १७ कोटींचं  सोनं 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन 
मुंबईहुन अहमदाबाद कडे जाणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसमध्ये एक आश्चर्य कारक घटना घडली आहे. या रेल्वेमधून जाणाऱ्या एका प्रवाशांकडून एवढे तेवढे नाही तर तब्बल १७ कोटी रुपयांचे सोने सापडले आहे. मनीष असे या प्रवाशाचं  नाव आहे.

[amazon_link asins=’B01N0WVC16,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’712f1791-b266-11e8-a6ac-e73814d8e316′]

याबाबत मिळाली अधिक अशी की, मनीष सूर्यनगरी एक्स्प्रेसमधील S9  कोचमध्ये बसला होता. त्यावेळी तिकीट चे करण्याकरिता तिथे टी .सी आला . त्याला मनीषच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्याच्याजवळ असलेल्या सामानाची टी.सी ने चौकशी केली आणि रेल्वे पोलिसांना ही खबर दिली . त्यानंतर पोलीस तिथे हजर झाले त्यांनी मनीषा जवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यांना सोने आढळून आले. पोलिसांनी मनीषाला ताब्यात घेतले.
या प्रकाराबाबत मनीषाला विचारले असता , हे  पार्सल त्याला सुरतला पोहोचवायचे होते , हे सोने नेमके  किती आहे याची माहिती आपल्याला नाही, पण ते १७ कोटीचे  आहे, असे  मनीषने सांगितले.

टेमघर धरणाच्या दुरुस्तीला आणखी दोन वर्षे लागणार

पोलिसांनी या सोन्याचे  वजन केले  असता, ते १७ किलोपेक्षा जास्त असल्याचे  समोर आले . बाजारभावाप्रमाणे त्याचे  मूल्य कोट्यवधीच्या घरात जाते . १७ किलो सोन्याची किंमत अंदाजे ५ कोटी १० लाख रुपये आहे.