Coronavirus : तरूणांना जास्त संक्रमित करतोय नवा ‘व्हायरस’, गळा कोरडा पडणं आणि डोळे लाल होणे आहेत नवी लक्षणे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देश सध्या कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी व्हायरसचा परिणाम आणि त्याची लक्षणे पहिल्यापेक्षा जास्त घातक आहेत. या दरम्यान जेनरेस्ट्रेस डायग्नोस्टिक सेंटरच्या प्रमुख गौरी अग्रवाल यांनी संसर्गाच्या काही नवीन लक्षणांबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी कोरोना संक्रमित रूग्णांमध्ये लक्षणे काही वेगळी दिसत आहेत. सोबतच मागच्या वर्षी ज्येष्ठांमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरत होता, मात्र, यावेळी व्हायरस तरूणांना जास्त संक्रमित करत आहे.

गौरी अग्रवाल यांच्यानुसार, यावेळी तरूणांमध्ये कोरोनाची लक्षणे तोंड सुकणे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनलची समस्या, मळमळ, कमजोरी, लाल डोळे आणि डोकेदुखीच्या तक्रारींच्या रूपात समोर आली आहेत. गौरी यांनी सांगितले की, प्रत्येकाला तापाची समस्या नसते. आम्ही टेस्टिंग खुप मोठ्या प्रमाणात करत आहोत. आता इन्फ्रास्ट्रक्चर / मशीन्सची कोणतीही समस्या नाही, समस्या सरकारच्या नव्या नियमाने होईल, ती ही आहे की 24 तासांच्या आत कोरोनाचा रिपोर्ट द्यावा लागेल.

दिल्लीत आता 24 तासात मिळेल कोरोना रिपोर्ट

दिल्ली सरकारने शनिवारी हा आदेश जारी केला होता की, कोरोनाचा रिपोर्ट आता टेस्ट केल्याच्या 24 तासांच्या आत जारी केला जाईल. दिल्लीत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे स्थिती खुप वाईट आहे. शनिवारी दिल्लीत संक्रमित रूग्णांचा आकडा 24 हजारच्या वर होता. सोबतच दिल्लीत ऑक्सीजन बेडची सुद्धा कमतरता भासत आहे.