शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्यानंतर वैभव पिचड आणि कालिदास कोळंबकर यांचाही राजीनामा ; उद्या भाजपात प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या मानहानीकारक पराभवानंतर आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या नेत्यांनी भाजप- शिवसेनेत जाण्याची सुरुवात केली आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांनी प्रवेशाचे निश्चित केले आहे. त्यात आच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रावादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि वैभव पिचड तर काँग्रेसचे कोळंबकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज तिघांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. तर भाजप नेते गिरीश महाजन यांनीही ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशावर खुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी ते भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र शिवेंद्रराजेंनी दिलेला राजीनामा दिल्याने ते भाजप प्रवेश करणार. यावर शिक्कामोर्तब झाला आहे. शिवेंद्रराजेंचा एक धक्का राष्ट्रावादीला बसतोय नाही तो अकोले मतदार संघातील आमदार वैभव पिचड यांनी राजीनामा देत राष्ट्रावादीला धक्का दिला आहे. तर वडाळा मतदार संघातील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनीही राजीनामा देत काँग्रेसला धक्का दिला आहे.
वैभव पिचड हे शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड यांचे पुत्र आहेत.

त्यांनी यापूर्वीही भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. गेल्या पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडला असून रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक विकासाच्या योजना विरोधी पक्षात असल्यानं पूर्ण होत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला यश मिळालं आणि आगामी विधानसभेत हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असून तालुक्याचा विकास व्हावा ही जनतेची भावना ओळखून भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर कालिदास कोळंबकर यांनी कालच काँग्रेसवरील नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवला होता. राजनामा देते वेळी त्यांनी ‘मी काँग्रेसवर नाराज होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचे कौतुक केले म्हणून मला पक्षाने बाहेर केले आहे’, असं सांगितले.

दरम्यान, भाजपमध्ये उद्या मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार आहे. मुंबईचे ५७ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. हा काँग्रेस आणि राष्ट्रावादीसाठी मोठा धक्का होता, त्यानंतर वैभव पिचड आणि शिवेंद्रराजेंचा राजीनामा त्याहून मोठा धक्का ठरत आहे.

आरोग्यविषयक वृत्त