दलित वस्ती विकासासाठी पुरंदरला 1 कोटी 48 लाख मंजुर : राज्यमंत्री विजय शिवतारे

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील दलित वस्तीतील कामांसाठी राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत १ कोटी ४८ लााख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री नामदार विजय शिवतारे यांनी दिली आहे. यात नीरा शिवतक्रार, खळद, नायगाव, राजुरी, वीर, दिवे, परिंचे, माळशिरस आदी गावातील ११ कामांचा समावेश आहे. प

शिवतारे पुढे म्हणाले, नीरा शिवतक्रार येथे सरपंच दिव्या पवार, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, पंचायत समिती सदस्य गोरखनाथ माने व इतरांनी दलित वस्तीतील चार कामांसाठी निधीची मागणी केली होती. राज्याच्या सामाजिक आणि न्याय विभागाने दलित वस्तीला लाभदायक ठरणारी कामे बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून हाती घेतली आहेत. ही कामे साधारणतः लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.

कामांचा तपशील पुढीलप्रमाणे –
नीरा गावठाणात दलित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीट करणे – ३० लाख , नीरा येथील वार्ड क्र ५ मध्ये अनुसूचित जाती वसाहतीत सभागृह – ३० लाख, नीरा येथील सर्वोदय सोसायटीत स्टेज बांधकाम – ५ लाख , नीरा येथील वार्ड क्र ३ घरकुल वसाहतीत पेव्हिंग ब्लॉक रस्ता व शौचालय युनिट – १५ लाख, नायगाव येथे दलित वस्ती रस्ता – १० लाख, राजुरी येथे दलित वस्ती रस्ता – १० लाख, वीर येथे दलित वस्ती रस्ता – २० लाख , दिवे येथे दलित वस्ती रस्ता – १० लाख , परिंचे येथे दलित वस्ती रस्ता – १० लाख , माळशिरस येथे दलित वस्ती रस्ता – ६ लाख, खळद येथे दलित वस्ती रस्ता – २ लाख .

ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार असल्याचे ना. शिवतारे यांनी सांगुन सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे व राज्यमंत्री अविनाश महातेकर यांचे आभार मानले. दरम्यान, पुरंदर तालुक्यात सर्वाधिक ८० लाख रूपयांचा निधी नीरा -शिवतक्रार गावासाठी मंजुर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like