लॉटरीच्या अमिषाने फसवणूक करणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लॉटरी लागल्याचे सांगून नागरिकांकडून वेगवेगळी कारणे सांगून पैसे उकळणाऱ्या एका नायजेरीयन युवकाला पुणे सायबर सेलच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मोबाईल, सिम कार्ड, लॅपटॉप, इंटरनेट डिव्हाईस जप्त करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c93f3174-a2f1-11e8-9702-ed8c1470d642′]

न्मोयी ओमोरुजी (वय – ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदाराने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी यांना त्यांना एक कोटी ७० लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचा मेसेज आला होता. फिर्य़ादी यांनी त्यांची वैयक्तीक आणि बँकेची माहिती [email protected] व [email protected]  या मेल आयडीवर पाठवली. त्यानंतर फिर्यादी यांना एक लिंक पाठवण्यात आली. आरोपीने फिर्यादी यांना टॅक्स कोड करिता ४५ हजार ८००, अकाऊंट अपग्रेड करण्यासाठी २ लाख ४८ हजार, अॅन्टी टेरेरीस्ट सर्टिफिकेटसाठी १ लाख ७० हजार रुपये अशी रक्कम फिर्यादी यांच्याकडून घेतली. तसेच रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड या बँकेचे मास्टर कार्ड कुरीअरने पाठवून कार्ड अॅक्टीव्ह करण्यासाठी सहा लाखांची मागणी केली. फिर्य़ादी यांनी सहा लाख रुपये देऊन ही लॉटरच्या बक्षीसाची रक्कम मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या गुन्ह्याचा तपास सायबर सेलचे पथक करत असताना आरोपीचा मोबाईल क्रमांकाचे आणि तात्रीक माहितीच्या आधारे आरोपी दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलचे एक पथक दिल्ले येथे पाठवण्यात आले. पथकाने दिल्ली येथे आरोपीचा शोध घेऊन आरोपीला तिलकनगर येथून अटक केली. आरोपीला फरासखाना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d515491d-a2f1-11e8-8177-31257d0b099d’]

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, पोलीस सह आयुक्त बोडखे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदि देशपांडे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह व सहायक पोलीस आयुक्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, पोलीस उप निरीक्षक नितन मस्के, पोलीस कर्मचारी अजित कुऱ्हे, नितेश शेलार, शिरीष गावडे, संतोष जाधव, अनुप पंडीत, शितल वानखडे यांच्या पथकाने केली.