काहीही काम न करता ‘या’ युवकाला मिळणार महिन्याला 8 लाख रुपये, ३० वर्षांसाठी लागली ‘लॉटरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील एका युवकाला लॉटरी लागली असून आता त्याला आयुष्यभरासाठी पैसे मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याला काहीही काम न करता त्याला ८ लाख रुपये मिळणार आहेत. पुढील ३० वर्षांपर्यंत त्याला हि रक्कम मिळत राहणार आहे. या पद्धतीची लॉटरी जिंकणारा तो देशातील पहिला व्यक्ती ठरला आहे. ब्रिटन सरकारने नॅशनल लॉटरी कंपनीने नवीन योजना नुकतीच सुरु केली होती. या लॉटरी योजनेला लॉटरी सेट फॉर लाइफ असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर अमेझॉनमध्ये काम करणाऱ्या डीन वीमेस नावाच्या व्यक्तीला हि लॉटरी लागली.

या योजनेनुसार या व्यक्तीला आता दरमहा ८ लाख ६ हजार रुपये मिळणार आहेत. हि लॉटरी जिंकल्यानंतर त्याने आपले अनेक प्लॅन बनवले असून यामध्ये त्याने सुट्टीवर तसेच फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे. त्याचबरोबर एका आजाराशी पीडित असलेल्या आपल्या भावावर तो सर्वात आधी उपचार करणार आहे. ३० जुलै रोजी मला लॉटरी जिंकल्याचे समजले, मात्र त्यावेळी मी ऑफिसमध्ये काम करत होतो. ब्रिटनमधील पीटरबोरोघमध्ये राहणाऱ्या डीन याने आयर्लंड मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने या विषयी बोलताना सांगितले कि, तो आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असून स्काई डाइव आणि बलून रायडींग सारख्या साहसी इच्छा पूर्ण करणार आहे.

दरम्यान, विद्यापीठामध्ये शिकत असताना त्याने एक डॉक्युमेंट्री बनवली होती. त्यानंतर त्याची हि डॉक्युमेंट्री मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाली होती. त्याचबरोबर हि लॉटरी लागल्याने ता तो हि नोकरी सोडून स्क्रीन रायटर बनणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –