नशिब असावं तर अस्सं ! पहिले ‘लॉटरी’ लागली अन् नंतर मिळाला ‘खजाना’, पिल्लईंची तर ‘लाईफ’च बनली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माणसाचं नशीब कधी बदलेलं सांगता येत नाही. एका रात्रीत राजा रंक बनू शकतो तर रंक राजा. अशीच घटना तिरुवनंतपुरममध्ये राहणाऱ्या बी. रत्नाकरन पिल्लई यांच्याबरोबर घडली जेव्हा त्यांना कळाले की त्यांना लॉटरीमध्ये 6 कोटी रुपये जिंकले आहे. पिल्लई यांनी लॉटरीमध्ये जिंकलेल्या पैशांतून यावर्षी भाजीच्या शेतीसाठी जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात पैसे गुंतवले.

66 वर्षीय पिल्लई यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्या नशीबाने चमत्कार केला आणि त्यांनी जी जमीन खरेदी केली होती त्यातून देखील ते मालामाल झाले. खरतर त्यांनी जमीन शेतीसाठी खरेदी केली परंतू त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात खजिना सापडला ज्यात अनेक अमूल्य शिक्के आणि विविध मुद्रा होत्या.

वृत्तानुसार जेव्हा पिल्लई यांनी आपल्या जमीन पेरणी करण्यासाठी खोदली तेव्हा त्यांच्या फावड्याचा मोठा आवाज आला ज्यामुळे त्यांनी शंका आली की माती खाली काहीतरी वस्तू आहे. जेव्हा त्यांना आणखी खोदले तर त्यांना तेथे एक पेटी सापडली ज्यात तांब्याचे हजारपेक्षा जास्त शिक्के होते.

या शिक्क्याबाबत समोर आलेल्या माहितीत कळाले की त्रावणकोरच्या तत्कालीन साम्राज्याचे ते धन आहे जे शेतात जमिनीत गाडून ठेवले होते. जमिनीच्या ज्या भागातून हा खजिना मिळाला. ती एका जुन्या श्री कृष्ण मंदिराच्या बाजूला आहे, ज्याला थिरुपलकदल श्री कृष्ण स्वामी क्षेत्र नावाने ओळखले जाते.

जेव्हा या पेटीतील शिक्के आणि मुद्रांची मोजणी केली तेव्हा त्याचे एकूण वजन 20 किलो 400 ग्रॅम होते. तर प्राचीन शिक्क्यांची संख्या 2,595 होती. इतक्या वर्षांनंतर मातीच्या खाली असताना देखील सर्व शिक्क्यांची ओळख त्रावणकोरच्या दोन राजांच्या शासनकाळातील असल्याचे कळाले.

हे दोन राजे श्री मूलम थिरुनम राम वर्मा आणि चिथिरा थिरुनल बाला राम वर्मा होते. श्री मूलम थिरुनल यांनी 1885 आणि 1924 च्या दरम्यान शासन केले आणि श्री चिथिरा थिरुनल बाला राम वर्मा त्रावणकोरचे अंतिम शासक म्हणून 1924 पासून 1949 पर्यंत शासनात होते आणि 1991 पर्यंत साम्राज्याचे महाराज राहिले.

पिल्लईच्या म्हणाले की या शिक्क्यांना राज्य सरकारकडे सोपवण्यात येणार आहे, कारण केरळ ट्रेजर अ‍ॅक्ट 1968 चे कलम 3 अंतर्गत असे करावे लागेल. या नियमांतर्गत कोणत्याही शोधणाऱ्यांना खजिन्याच्या 25 रुपयांच्या रक्कमेपेक्षा जास्त किंमत किंवा ऐतिहासिक, पुरातात्विक किंवा कलात्मक असेल तर त्याला सरकारी खजिन्यात जमा करावे लागेल. या शिक्क्यांची किंमत कोट्यावधीच्या रक्कमेत जात आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like