Loudspeaker Row Pune | पुणे ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील 222 मशिदी आणि 96 मंदिरांवरील लाऊडस्पीकरला (भोग्यांना) परवानगी, पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Loudspeaker Row Pune | मशिदींवरील भोंग्यावरुन (Loudspeakers On Masjid) राज्यात राजकारण तापलं असतानाच भोंगे हटवले जाऊ नयेत यासाठी संबंधित मशिदींच्या व्यवस्थापकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलाच्या हद्दीतील 226 मशिदींनी भोंगे (लाऊडस्पीकर) लावण्यासाठी पोलिसांकडे रितसर परवानगी मागितली होती. त्यापैकी 222 मशिदींना लाऊडस्पीकर लावण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही परवानगी दिली आहे. (Loudspeaker Row Pune)

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे भोंगे हटवले नाही तर मशिदींसमोर भोंगे लावून त्यावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Police) हद्दीतील मिशीदींच्या व्यवस्थापकांकडून भोंग्यांसाठी परवानगी घेण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केले आहेत. तसेच मंदिरावरील (Temple) भोंग्यांसाठी परवनगी मिळावी यासाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आले आहेत. (Loudspeaker Row Pune)

पुणे ग्रामीण पोलिसांकडे मंदिरावरील भोंग्यांना परवानगी मिळावी यासाठी 99 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 96 मंदिरांना परवानगी देण्यात आली आहे. तर मशिदींवरील भोंग्यांसाठी 226 अर्ज पोलिसांकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 222 मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. भोंग्यांना परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार (Noise Pollution Act) घालून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर अर्ज केलेल्या मंदिर आणि मशिदी यांना परवानगी दिली आहे.

मंदिर आणि मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी देताना कोणीही कायदा हातात घेऊ नये व नियमांचे पालन करवे.
तसेच नागरिकांनी सामाजिक व धार्मिक सद्भावना जपावी असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी केले आहे.

Web Title :-  Loudspeaker Row Pune | Pune Rural Police allows loudspeakers on 222 mosques and 96 temples in the district, but …

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

MNS Chief Raj Thackeray Appeal | मनसेची माघार नाहीच ! ‘भोंग्यावर अजान झाली तर हनुमान चालिसा लावाच’; राज ठाकरेंचं आवाहन

PMPML | पीएमपीएमएलच्या संचालकपदावर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष कायम ! वेबसाईटच अपडेट न केल्याने गोंधळ

Raj Thackeray | राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेत्याचं मोठं विधान; म्हणाले – ‘पोलिसांनी जर अटक केली तर…’