‘ते’ केलं नाही म्हणून १०७ वर्ष जगले, आजीबाईंनी सांगितलं दीर्घायुष्याचं ‘गुपित’

पोलीसनामा ऑनलाईन : लग्नाचा एक मोठा फायदा एका आजीबाईंनी सांगितला आहे. दीर्घायुषी व्हायचे असेल तर लग्न करू नका ’असा दीर्घायुष्याचा नवा मंत्र लुईस सिग्नोर या १०७ वर्षीय आजीबाईंनी दिला आहे. ही लुईस सिग्नोर नामक महिला कोणी सेलिब्रिटी वगैरे नक्कीच नाही. न्यू-यॉर्कच्या ब्राँक्स येथे वास्तव्यास असलेली ही एक सामान्य महिला. एक दिवसापूर्वीच म्हणजे बुधवारी(दि.30) या महिलेने आपला तब्बल १०७ वा जन्मदिन साजरा केला.

मी अद्यापही सिंगल
“मी इतरांप्रमाणे व्यायाम करते, थोडाफार डान्स देखील करते पण मी अजून लग्नच नाही केलंय, अद्यापही मी सिंगल आहे आणि खरंच मला असं वाटतं की लग्न न करणे हेच माझ्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य असावं. मी पण लग्न केलं नसतं तर किती बरं झालं असतं, अशी माझी बहिण सतत मला म्हणत असते”, असं लुईस सिग्नोर सीएनएनशी बोलताना म्हणाल्या. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्या बहिणीनेही आजघडीला वयाची 102 वर्षे ओलांडलीत.

सध्या, एलेलिया मर्फी ( वय ११४) यांना अमेरिकेतील सर्वात वृद्ध महिला म्हणून ओळखलं जातं. मर्फी या न्यू-यॉर्कच्या हार्लेम या भागात राहतात. विशेष म्हणजे सिग्नोर यांचा जन्मही हार्लेम येथेच झालाय.सिग्नोर यांनी वयाची १०७ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त त्यांच्यासाठी हा आनंद साजरा करण्यासाठी कूप सिटी येथील बार्टो कम्युनिटी सेंटरमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला १०० हून अधिकजण उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –