‘सोशल’वर निगेटिव्ह कमेंट आल्यानंतर आता ‘कार्तिक-सारा’च्या ‘लव आज कल’नं कमावले ‘इतके’ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा लव आज कल 2 हा सिनेमा कालच(14 फेब्रुवारी) वॅलेंटाईन डे च्या निमित्तानं रिलीज झाला. कार्तिक आणि सारा यांच्या फ्रेश केमिस्ट्रीसोबत डायरेक्टर इम्तियाज अलीचा हा वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. या सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. या सिनेमानं पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर 12.40 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. सोबतच त्यानं कार्तिकच्या इतर सिनेमांच्या कमाईबद्दलही सांगितलं आहे. यात प्यार का पंचनामा या सिनेमाचाही समावेश आहे.

काल सिनेमा रिलीज झाल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसल्या. लव आज कल 2 या सिनेमाला आलेल्या रिअ‍ॅक्शनवरून असं स्पष्ट दिसलं की, सारा आणि कार्तिकची रोमँटीक स्टोरी प्रेक्षकांना इम्प्रेस करू शकली नाही. सिनेमाची स्टोरी जरी चाहत्यांना आवडली नसली तरी सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. प्रेक्षकांनी दोन्ही अ‍ॅक्टर्सच्या अ‍ॅक्टींगची स्तुती केली आहे. अनेक निगेटीवन कमेंट येऊनही सिनेमानं चांगली कमाई केल्याचं दिसत आहे.

तान्हाजी सिनेमानंतर पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा लव आज कल 2

ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शचं म्हणणं आहे की, लव आज कल 2 हा सिनेमा म्हणजे कार्तिकच्या करिअरची सर्वात मोठी सुरूवात आहे. तान्हाजी द अनसंग वॉरियर आणि लव आज कल 2 हे पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे आहेत.

You might also like