Love Aaj Kal 2 Review : ‘सारा-कार्तिक’च्या सिनेमाकडून निराशा, चाहते म्हणाले – ‘फ्लॉप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा लव आज कल 2 हा सिनेमा आजच वॅलेंटाईन डे च्या निमित्तानं रिलीज झाला. कार्तिक आणि सारा यांच्या फ्रेश केमिस्ट्रीसोबत डायरेक्टर इम्तियाज अलीचा हा प्रयोग बऱ्याच प्रमाणत फेल झाल्याचं दिसत आहे. सिनेमाला आलेल्या सोशल रिअ‍ॅक्शन निगेटीव असल्याचं दिसत आहे. लव आज कलला लोक डिसास्टर म्हणत आहेत.

चाहते म्हणाले, सैफच्या सिनेमापुढे काहीच नाही साराचा लव आज कल

11 वर्षांपूर्वी सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांचा लव आज कल हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. हा सिनेमा इम्तियाज अलीनंच बनवला होता. परंतु दोन्ही सिनेमात बराच फरक दिसत आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की, सैफच्या लव आज कल पुढे साराचा सिनेमा कमजोर आहे.

सोशल रिअ‍ॅक्शन

लव आज कल 2 या सिनेमाला आलेल्या रिअ‍ॅक्शनवरून असं स्पष्ट दिसत आहे की, सारा आणि कार्तिकची रोमँटीक स्टोरी प्रेक्षकांना इम्प्रेस करू शकली नाही. अनेकांनी या सिनेमाला फ्लॉप म्हटलं आहे. एका चाहत्यानं म्हटलं आहे की, फुल टाईम बोरिंग आणि डी ग्रेड सिनेमा आहे. हा सिनेमा खूप बकवास आहे. यामुळे तुमच्या डोक्याच्या नसा खराब होतील.

आणखी एकानं म्हटलं आहे की, तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका. हा इम्तियाज अलीचा कमजोर सिनेमा आहे. एकानं सिनेमातील डायलॉग वापरत म्हटलं आहे की, तू मला वैताग द्यायला लागला आहे. काहींना हा सिनेमा आवडला आहे ज्यांनी या सिनेमाला पॉजिटीव रिअॅक्शनही दिली आहे.

अभिनयाचं कौतुक

सिनेमाची स्टोरी जरी चाहत्यांना आवडली नसली तरी सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. प्रेक्षकांनी दोन्ही अ‍ॅक्टर्सच्या अ‍ॅक्टींगची स्तुती केली आहे.

पहिल्या दिवशी कमवू शकत इतके कोटी

ट्रेड एक्सपर्टच्या मते, सारा आणि कार्तिक आर्यनचा लव आज कल पहिल्या दिवशी 12-13 कोटी कमावण्याची शक्यता आहे. सिनेमाबद्दल सुरू असलेली चर्चा पाहता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 10 कोटी कमावण्याची शक्यता आहे. कारण अनेक शहरांमध्ये सिनेमाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग फुल झालेली आहे.

You might also like