‘कार्तिक-सारा’नं चाहत्यांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, केलं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सारा अली खान आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांचा आगामी सिनेमा लव आज कल 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दोघंही पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

नुकतेच कार्तिक आणि सारा सिनेमाच्या प्रमोशनसाठी अहमदाबादला पोहोचले होते. दोघांची फॅन फॉलोविंग मोठी आहे. त्यांनी जमावापासून वाचण्यासाठी एक नवी युक्ती केली. कार्तिकनं चेहऱ्याला मास्क लावला होता. तर सारानंही ओढणीनं आपला चेहरा कव्हर केला होता. दोघेही चाहत्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. तरीही एका चाहत्यानं त्यांना ओळखलंच आणि त्यांच्यासोबत एक स्पेशल फोटोही काढला.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचा लव आज कल 2 हा सिनेमा वॅलेंटाईन डेच्या दिवशीच म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात कार्तिक आणि सारा यांच्या व्यतिरीक्त रणदीप हुड्डा देखील दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. चाहत्यांचा मोठा प्रतिसाद ट्रेलरला मिळाला होता. हम भी अकेले तुम भी अकेले या सिनेमासोबत हा सिनेमा क्लॅश होणार आहे.