हार्दिक पांड्यानं ‘तिला’ दिली लिफ्ट अन्…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सर्बियाची अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत हार्दिक पांड्याचे सध्या प्रेमसंबंध जुळल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हार्दिक आणि नताशा हे दोघेही मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र डीनर घेऊन बाहेर पडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर हार्दिकनं नताशाला त्याच्या गाडीत लिफ्ट दिल्याचे पाहायला मिळाले.

हार्दिक आणि नताशा एकत्र गाडीत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले नाहीत. पण, या दोघांनी पोस्ट केलेल्या स्वतंत्र फोटोवरून तरी ते एकाच गाडीत होते असे दिसून येतंय. यापूर्वी हार्दिकने इन्स्टाग्रामवर इन लव्ह असं पोस्ट केलं होतं, त्याला नताशाने तसाच प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली होती.

मुळची सर्बियाची असलेल्या नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षीय डान्स शिकायला सुरुवात केली. 2010 मध्ये स्पोर्ट्स सर्बिया या किताब जिंकल्यानंतर तिनं स्पोर्ट्समध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. तिने नच बलिए 9 सीजनमध्ये सहभाग घेतला होता.

Visit : Policenama.com