प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’

गोरखपूर : वृत्तसंस्था – प्रत्येकाला त्यांचं खरं प्रेम Love मिळतं असं नाही. कुटुंबाचा नकार, समाजाकडून होणारा विरोध, दोन कुटुंबातील भांडणं, हाणामारी अशा अनेक कारणांमुळे प्रेमभंग love breakup होतात. काहीवेळा गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडकडून नकार मिळतो. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडला आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर लग्नाला नकार देऊन धोका love breakup देणाऱ्या प्रियकराच्या घरी प्रेयसीने थेट वरात नेली.

नोकरी मिळताच संबंध तोडले

तरुणीचे ज्या मुलावर प्रेमसंबंध होते तो तरुण सैन्यात आहे. दोन वर्षापूर्वी ही तरुणी तिच्या मावशीकडे गेली होती.

त्यावेळी संदीप मौर्य नावाच्या तरुणासोबत तिची ओळख झाली. तरुणीने सांगितले की, संदीपने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध बनविण्यास भाग पाडले.

परंतु नोकरी मिळताच त्याने संबंध तोडले. तरुणीच्या नातेवाईकांनी देखील हे खरे असल्याचे सांगितले.

संदीपने तरुणीसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून आई-वडिलांसोबत लग्नाची बोलणी देखील केली होती.

तरुणी वरात घेऊन पोचली घरी

संदीप दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत होता.

यावेळी तरुणीने त्याच्या घरासमोर आपली वरात नेली. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले.

त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तरुणीला समजावले.

तरुणीने आणलेली वरात मागे घेतली. परंतु तिने प्रियकराला लग्न केले नाही तर आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली.

त्याने सैन्यात नोकरी लागल्यानंतर मला धोका दिला, असा आरोप तरुणीने केला आहे.

पोलिसांत FIR दाखल

तरुणाने तिला लग्नास नकार देताच तिने त्याच्या आणि कुटुंबाच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, संदीपला लग्न करण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. कारण ते त्याचे पहिलेच कायदेशीर लग्न आहे. तरुणीला कायदेशीर मार्गाने न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

Also Read This : 

अहमदनगर जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे Unlock होणार – पालकमंत्री हसन मुश्रीफ

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

बलात्कारप्रकरणी सुप्रीम कोर्टाची टिपण्णी, म्हणाले – ‘जेव्हा एक मुलगा-मुलगी खोली एकत्र असतात तेव्हा…’

 

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

 

भाजप नेत्या पंकजा मुंडेचे रोखठोक उत्तर, म्हणाल्या – ‘धनंजयच्या खासगी प्रकरणाचे समर्थन करणार नाही, पण…’