‘लव्ह चॅट्स’ लग्नाच्या आमिषाने महिलेने तब्बल 1 कोटी रुपयांना घातला गंडा

पोलिसनामा ऑनलाईन – लग्नाच्या बहाण्याने महिलेने अमेरिकेतील एका तरुणाची तब्बल 65 लाखांची फसवणूक केली आहे. पहिल्या तक्रारीनंतर 27 मे रोजी या महिलेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हैद्राबादमधील आयटी इंजिनिअप के.पी.एच.बी. पोलिसात महिलेविरोधात तक्रार नोंदविली आहे. आतापर्यंत तिने तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मालविका देवती असे महिलेचे नाव आहे.

व्हाट्सएप आणि टेलिग्रामवर मालाविकाने तिच्या लव्ह चॅट्स ने तरुणाला फसवले आहे. स्वत:च्या बचतीसह त्याने महिलेला पैसे देण्यासाठी दुसर्‍यांकडून कर्जही काढले. 27 मे रोजी ज्युबिली हिल्स पोलिसांनी मालविका आणि तिचा मुलगा प्रणव ललित गोपाळ देवाथी (वय 22) यांना अमेरिकेतील एनआरआय अभियंत्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या महिलेने बनावट प्रोफाइल वापरुन लग्नाचे आमिष दाखवून इंजिनिअर तरुणाकडून कोटींमध्ये रुपये उकळल्याचा आरोप आहे. तिने जुबिली हिल्समधील डॉक्टरच्या नावाखाली तरुणाची फसवणूक केली.

मालविकाने त्याला सांगितले की, तिच्याकडे बरीच मालमत्ता आहे आणि मात्र तिची आई सर्व संपत्ती तिच्याकडे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत आहे. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर लढा देण्यासाठी तिला पैशांची गरज आहे. त्या एनआरआयला मालविकाने केलेली थाप पटली. आणि त्यांनी 65 लाख रुपये पैसे ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तिच्याशी संपर्क होत नसल्याने आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. सोमवारी हैदराबादमधील तरुणाने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्याने केलेल्या तक्रारीनुसार मालवीकाने अमेरिकेतील अनु पल्लवी या डॉक्टरच्या बनावट नावाचा प्रोफाइल वापरला आहे. तिच्या कुटुंबाचे राजकीय संबंध असल्याने तिला बँक खाते वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे तिने यावेळी सांगितल्याचे तरुणाने सांगितले. यापूर्वी देखील मालविकाने अशाच पद्धतीचा वापर करीत अशीच फसवणूक केली होती.