पुणे : लोणीकंद परिसरातील खाणीच्या पाण्यात आढळला नवरा-बायकोचा मृतदेह, प्रचंड खळबळ

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली (ता. हवेली) परिसरातून गायब झालेल्या नवरा-बायकोचा मृतदेह लोणीकंद येथील खाणीच्या पाण्यात आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली आली आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश म्हस्कु नागरे (रा. सोहम रेसिडन्सी, वाघोेली) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. गणेश यांचा भाऊ मंगेश नागरे (26) आणि प्रियंका नागरे (20) हे दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता घरातून काहीही न सांगता निघून गेले होते. कुटूंबियांनी त्यांचा परिसरात शोध घेतला मात्र ते कोठेही आढळुन आले नाहीत. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. बुधवारी सकाळी दोघांचा मृतदेह लोणीकंद परिसरातील खाणीच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. मंगेश आणि प्रियंका यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्‍न झाले आहेत.

पुढील तपास लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी.एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस करीत आहेत.

You might also like