मेहुणीवर ‘जीव’ आल्यानं ‘त्यानं’ दिलं गुंगीचं औषध, भावोजीनं केला बलात्कार अन् तिचं लग्न ठरलं तर केला ‘तसला’ व्हिडीओ व्हायरल

भरतपूर/राजस्थान : वृत्तसंस्था – मेहुणीला गुंगीचे औषध देऊन भाऊजीने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील भरतपूरमध्ये उघडकीस आला आहे. एका पीडित तरुणीने आपल्या भाऊजी विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे. तरुणीने आरोप केला आहे की, तिच्या भाऊजीने तिला गोडबोलून आधी सोबत नेले आणि नंतर नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. एवढेच नाही तर तिचा अश्लिल व्हिडीओ काढला. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी भावोजीला बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित तरुणीचे लग्न जमल्यानंतर आरोपीने तिचे लग्न मोडण्यासाठी तिचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल केला. एवढेच नाही तर त्याने पीडित तरुणीचा अश्लिल व्हीडीओ तिच्या होणाऱ्या पतीला पाठवला. असे सांगितले जात आहे की, पीडित 21 वर्षीय तरुणी बीए फायनल वर्षाची विद्यार्थी असून येत्या 27 एप्रिल रोजी तीचे लग्न होणार होते.

पीडित तरुणीने सांगितले की, तिचा भाऊजी अलवरचा राहणारा आहे. फेब्रुवारी महिन्यात आरोपी यादराम तिला अलवरला घेऊन गेला. अलवरला घेऊन गेल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करुन मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तिला स्टेशनवर सोडून फरार झाला. जेव्हा मुलीचे लग्न होणार होते त्यावेळी आरोपीने तिचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल करुन तो व्हिडीओ तिच्या पतीला पाठवला.

पोलीस अधिकारी नरेंद्र सिंह राजावत यांनी सांगितले की, एका तरुणीने तिच्या भाऊजी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने आरोप केला आहे की, तिच्या भाऊजीने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. आता तिचे लग्न ठरले असून त्याने तिचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन आरोपी भाऊजीला अटक केली आहे.