‘WhatsApp’ अणि ‘Facebook’ वर ‘Love’, तिनं सोडलं नवर्‍याला अन् थेट पोहचली प्रियकराची घरी, पुढं झालं ‘असं’ की बस्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक व्यक्ती प्रेमात काहीही करायला तयार असतात. झारखंडमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. येथील एक महिला आपल्या प्रेमीला भेटण्यासाठी दुसऱ्या गावात आली. त्यानंतर नातेवाईकांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी देखील तात्काळ तिचा शोध घेत महिलेला सापडले. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील पी. पी. प्रसाद यांच्या घरी बतेश कुमार हा भाड्याने राहत आहे. त्याच्या पत्नीचे सोशल मीडियावर प्रेमसंबंध जुळले. मात्र व्हाटसपवर झालेल्या या प्रेमापायी या महिलेने चक्क आपले घर सोडत या प्रेमींच्या घरी राहायला आली. दुसरीकडे तिच्या पतीने ती हरवल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मोबाईल ट्रॅक करून तिचा शोध घेतला. त्यानंतर तिला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, महिलेला ताब्यात घेण्यात आले असून तिला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तसेच पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com