लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने काढला काटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा तिच्याच प्रियकराने मित्रांच्या मदतीने खून केला. खून केल्यानंतर मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील शिरसाड गावात नेवून पुरला. दरम्यान, मुलीच्या घरच्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करुन तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी मृदहेह बाहेर कढून जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

रोहिणी घोरपडे (वय-२८) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. सुनील शिर्के, राम जाधव, विजयसिंह मोरे यांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली. रोहिणी ही १४ नोव्हेंबर रोजी मैत्रिणीच्या लग्नाला जाते असे सांगून गेली होती. परंतु ती घरी परतलीच नसल्याने तिच्या भावाने मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मानखुर्द पोलीस रोहिणाचा शोध घेत असताना ती नोकरी करीत असलेल्या नवी मुंबई येथील नोकरीच्या ठिकाणी चौकशी केली. चौकशी दरम्यान या ठिकाणी असलेल्या सुनिल शिर्के याच्याबरोबर रोहिणीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी रोहिणीच्या एसबीआय बँक खात्याची माहिती घेतील. माहितीमध्ये तिच्या एटीएममधून १६ नोव्हेंबरला कोपरखैराणे येथील एटीएममधून ६५ हजार रुपये काढल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी पैसे काढणाऱ्याचा शोध घेतला असता रोहिणीचा प्रियकर सुनील याचा मित्र राम जाधव याने पैसे काढल्याचे तपासात निष्पन्न झाले.

रोहिणीने लग्नासाठी सुनीलच्या मागे तगादा लावल्याने सुनीलने तिचा काटा काढण्याचे ठरवले होते. तशी तयारी देखील त्याने केली होती. खून केल्यानंतर तिचा मृतदेह शिरसाड येथे पुरण्यासाठी त्याने खड्डा देखील खाणून ठेवला होता. पोलिसांनी राम जाधव याचा माग काढून ताब्यात घेत सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान रोहिणीच्या खूनाचा उलगडा झाला.

१४ नोव्हेंबरला कारने सुनील आणि रामने रोहिणीला माणगावला नेले. कार चालक विजयसिंह मोरे हा देखील सुनीलचा मित्र. राम आणि विजयसिंहच्या मदतीने सतत लग्नसाठी आग्रह धरत असलेल्या रोहिणीचा नियोजनपूर्वक काटा काढला. लग्नाचा तगादा लागल्याने रोहिणी आणि सुनील यांच्यात सतत वाद होत. शेवटी तिघांनी मिळून माणगाव येथील शिरसाड गावात नेवून रोहिणीच्या डोक्यात लाकडी फावड्याने जोरदार प्रहार करून तिला ठार केले. आणि दोन दिवस अगोदर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात तिचा मृतदेह पुरला. पोलिसांनी राम, सुनील आणि विजयसिंहला ६ फेब्रुवारीला अटक केली असून दोन महिन्यानंतर पुरलेले रोहिणीचे प्रेत बाहेर शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन महिन्यांनी मानखुर्द पोलिसंनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळून हत्येचा गुन्हा उघड केला आहे.