जगण्याची लढाई हरली ’लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर थिरकणारी ‘ती’ मुलगी, VIDEO मध्ये दिसले होते जगण्याचे मनोधैर्य; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस कहर सुरू असतानाच ’लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर ऑक्सीजन लावलेला असतानाही बेडवर बसून थिरकणार्‍या त्या मुलीची जगण्याने अखेर साथ सोडली. दिल्लीच्या एका हॉस्पिटलमधील या मुलीचा व्हिडिओ वायरल झाला होता, तीने आता जगाचा निरोप घेतला आहे. हॉस्पिटलमधूनच एका व्हिडिओद्वारे ’जियो तो हर पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो’चा संदेश देणार्‍या या मुलीचा गुरुवारी कोरोनाने मृत्यू झाला. याची माहिती त्याच डॉक्टर मोनिका लंगेह यांनी दिली आहे, ज्यांनी या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता.

 

 

 

 

दिल्लीच्या एका हॉस्पिटलच्या डॉ. मोनिका लंगेह यांनी 8 मे रोजी एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला होता, ज्यामध्ये 30 वर्षांची ही मुलगी बेडवर बसूनच ’लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर थिरकताना दिसली होती. परंतु गुरुवारी रात्री त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे वृत्त डॉ. मोनिका लंगेह यांनी आपल्या ट्विटरवर दिले आणि लिहिले- ’मी खुप दु:खी आहे…आम्ही हा ब्रेव्ह सोल गमावला. प्लीज, कुटुंबासाठी आणि मुलांसाठी प्रार्थना करा की त्यांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळावी.

यापूर्वी व्हिडिओ शेयर करताना डॉ. मोनिका लंगेह यांनी माहिती दिली होती की, मृत मुलगी अवघी 30 वर्षांची होती. तिची प्रकृती गंभीर होती, परंतु आयसीयु मिळाला नाही तेव्हा कोविड इमर्जनसीमध्येच उपचार सुरू केले. मागील 10 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते आणि एनआयव्ही सपोर्टवर होती. तिला रेमडेसिविर सुद्धा दिले, प्लाझ्मा थेरेपी सुद्धा झाली. मुलीची इच्छाशक्ती प्रचंड मजबूत होती.

 

 

 

 

 

त्यांनी म्हटले त्या मुलीने मरण्याच्या पूर्वी एक गाणे लावण्याची विनंती केली, जी त्यांनी मान्य केली. मात्र, 10 मे रोजी डॉ. मोनिका यांनी ट्विट करून सांगितले होते की, मुलीला आयसीयू बेड मिळाला, परंतु तिची प्रकृती स्थिर नाही आणि अखेर तिचे निधन झाले. या मुलीचा व्हिडिओ अनेक दिवस ट्रेंड मध्ये होता.