धक्कादायक ! प्रियकरानं भल्या पहाटे ‘सेक्स’ची मागणी केल्यानंतर प्रेयसीनं त्याच ‘घर’च पेटवलं

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराचे घरच पेटवून दिल्याची घटना अमेरिकेत न्यू जर्सी येथे घडली आहे. टेईज रस्सेल (वय 29) असं त्या आक्रमक तरुणीचं नाव आहे. 4 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी प्रेयसीला अटक केली आहे.

रस्सेल हिच्या प्रियकराने तिला पहाटे चार वाजता फोन करून सेक्स’ करण्याची इच्छा व्यक्त केली आणि घरी बोलवले. रस्सेल तत्काळ प्रियकराच्या घरी पोहचली. मात्र, प्रेयसी जेव्हा घरी आली तेव्हा तो झोपलेला होता. प्रियकराला झोप लागल्यामुळे त्याने घर उघडले नाही. यामुळे चिडलेल्या रस्सेल हिने जवळच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणलं आणि प्रियकराच्या घरावर टाकून आग लावली आणि पळून गेली. घरात धूर झाल्याने प्रियकराला जाग आली मात्र तोपर्यंत घराचा पुढचा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. घराच्या खिडकीच्या काचा फोडून तो घराबाहेर पडला व पोलिसांकडे गेला. पोलिसांनी या घटनेबाबत अग्निशामन दलाला माहिती दिली. पोलिसांनी घराबाहेरील सीसीटीव्हीमधील फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.

आरोग्यविषयक वृत्त –