4 मुलांच्या आईला रात्री भेटायला गेला ‘प्रियकर’, सासरच्यांनी बेडरूममध्ये पकडलं, ‘नग्न’ अवस्थेत मारहाण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारच्या गोपाळगंजमध्ये एका तरुणाला आपल्या विवाहित प्रेयसीला भेटणे महागात पडले. महिलेच्या सासरच्यांनी प्रेयसीला बेडरूममध्ये रंगेहाथ पकडले. यानंतर त्यांनी प्रियकराला ओढत रस्त्यावर आणले आणि इतकी मारहाण केली की त्याला आता गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वास्तविक, गोपाळगंजच्या मुर्गिया गावात रात्रीच्या अंधारात एक तरुण विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी पोहोचला. महिलेच्या सासरच्यांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी प्रियकराला बेडरूममध्ये पकडले.

यानंतर तरुणाला सासरच्यांनी ओढत बाहेर काढले आणि नग्न करून मारायला सुरुवात केली. हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक देखील जमा झाले आणि संपूर्ण घटना समजताच जमावाने देखील त्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली.

आरोपानुसार कुटुंबातील सदस्यांनी त्या तरुणाच्या पायाला दोरी बांधून त्याला अनेक किलोमीटरपर्यंत ओढत नेले. काही ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सांगण्यावरून जमावाने आरोपी प्रियकराला सोडले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्या युवकाचा जीव वाचवला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले.

रिपोर्टनुसार गावकऱ्यांनी सांगितले की तरुण ज्या विवाहित महिलेला भेटायला आला होता ती चार मुलांची आई आहे. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात कोणतेही विधान करण्यास नकार दिला आहे.