विवाहबाह्य संबंधातून प्रेमी युगलाची आत्महत्या

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन – कर्जत तालुक्यातील कडाव जवळील वडवली येथे एका प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रेमी युगलाचे विवाहबाह्या प्रेमसंबध होते. ही घटना उल्हास नदीवरील पुलाखाली उघडकीस आली. सचिन घुडे (वय-३२) आणि विवाहित महिला नम्रता मराडे (वय-३०) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सचिन घुडे आणि नम्रता मराडे हे दोघे वडवली या गावचे रहिवाशी आहेत. सचिनचे विवाहित नम्राता हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी हे दोघे पळून गेले होते. मात्र गावकऱ्यांनी त्यांना शोधून पुन्हा गावात आणले होते. यानंतर नम्रताच्या पतिने तिला पनवेल येथे घेऊन गेला. मात्र, हे दोघे पनवेलमधून पळून गेले होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

या दोघांचे मृतदेह टाटा भिवपुरी कडे जाणाऱ्या जुन्या रेल्वे मार्गालगत असणाऱ्या उल्हास नदीवरील पुलाखाली आढळला. पुलाच्या लोखंडी रॉडला या दोघांचे मृतदेह नॉयलॉनच्या दोरीने टांगलेल्या अवस्थेत दिसून आले. रोहीदास घुडे याने कर्जत पोलिसांना या बाबत कळविले. खबर मिळताच पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचासमोर पंचानामा केला. दोघांजवळून सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये आम्ही दोघे आत्महत्त्या करीत आहोत आमच्या मृत्यू प्रकरणी कोणाला जबाबदार धरू नये असे त्यात लिहले आहे.

You might also like