Low Blood Sugar | व्हिटामिन-D च्या कमतरतेने होते लो ब्लड शुगर, जाणून घ्या ताबडतोब शुगर लेव्हल वाढवण्यासाठी काय करावे

0
213
Low Blood Sugar | low blood sugar hypoglycemia caused by lack of vitamin d what to do and eat to get rid of it immediately
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Low Blood Sugar | आपल्या देशात मधुमेह ही एक सामान्य समस्या आहे. बहुतांश घरांमध्ये या आजाराने त्रस्त व्यक्ती आढळतात. याबाबत वैद्यकीय शास्त्रात विविध संशोधने सुरू आहेत. सामान्यतः जेव्हा लोकांमध्ये Vitamin-D ची कमतरता असते तेव्हा त्यांची ब्लड शुगर कमी होते. याला हायपोग्लायसेमिया (Hypoglycemia) म्हणतात. (Low Blood Sugar)

 

जर रक्तामध्ये पुरेसे ग्लुकोज नसेल, तर शरीराला आणि मेंदूला आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि तुम्ही नीट कार्य करू शकत नाही. जेव्हा ब्लड शुगर लेव्हल 70 मिलीग्राम प्रति डेसीलिटर पेक्षा कमी असते, तेव्हा त्याला लो ब्लड शुगर म्हणतात. मात्र, हे प्रत्येकासाठी भिन्न आहे.

 

वेळीच खबरदारी घेणे आवश्यक
डॉक्टर सांगतात की, याबाबत वेळीच माहिती मिळाल्यास ताबडतोब जागरूक होऊन खबरदारीच्या उपाययोजना सुरू कराव्यात. ब्लड शुगर वाढवण्यासाठी सर्वप्रथम ग्लुकोजच्या गोळ्या, हार्ड कँडी किंवा फळांचा ज्यूस घेणे सुरू करावे. याशिवाय तज्ज्ञ सांगतात की, व्हिटॅमिन डीमुळे शरीराची इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. त्यामुळे कमी पडू देऊ नका. (Low Blood Sugar)

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होत असेल ब्लड शुगर कमी तर करा हे उपाय
ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी फळाचा एक तुकडा, जसे की केळी, सफरचंद किंवा संत्रा, मनुका, द्राक्षे, 1/2 कप सफरचंद, संत्री, अननस किंवा द्राक्षाचा रस, 1/2 कप नियमित सोडा, 1 कप फॅट फ्री दूध, मध किंवा जेली, प्रोटीन किंवा फॅटयुक्त पदार्थ जसे की पीनट बटर, आईस्क्रीम आणि चॉकलेट घ्यावे. याशिवाय होल ग्रेन ब्रेड आणि इतर हाय फायबर पदार्थही घेता येतात.

 

ज्या लोकांना अनेकदा लो ब्लड शुगरचा त्रास होतो त्यांनी ग्लुकोज जेल आणि चघळण्यायोग्य ग्लुकोजच्या गोळ्या सोबत ठेवाव्यात. या अशा गोष्टी आहेत ज्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देखील उपलब्ध होतात.

 

आजकाल ग्लुकागॉन किट (Glucagon kit) ही बाजारात मिळतात.
हे एक हार्मोन आहे जे लिव्हर (Liver) ला रक्तप्रवाहात (Blood Stream) ग्लुकोज सोडण्यास प्रवृत्त करते.
मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचा वापर करा.
जास्त वेळ अन्न न खाल्ल्याने किंवा पुरेसे अन्न न घेतल्यानेही ब्लड शुगर कमी होते.
काही स्नॅक्स खाल्ल्यानंतर जर तुमची शुगर लेव्हल नॉर्मल झाली तर ही काही विशेष समस्या नाही,
पण जर तसे होत नसेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Low Blood Sugar | low blood sugar hypoglycemia caused by lack of vitamin d what to do and eat to get rid of it immediately

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Rains | पुणेकरांना दिलासा ! खडकवासला धरण प्रकल्पात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, एका दिवसात 1 TMC पाणीसाठा वाढला

 

Pune Crime | खळबळजनक ! आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

 

Ajit Pawar | शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच ! अजित पवारांकडून वकिलांसोबत झालेल्या चर्चेचा दाखला