कमी किंमतीच्या Nokia C3 ची भारतात सुरु झाली प्री-बुकिंग, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकियाच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. HMD Global च्या नवीनतम किफायतशीर स्मार्टफोन नोकिया सी३ चे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. आता ग्राहक हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साइटवर जाऊन प्री-बुक करू शकतात. नोकिया सी३ ची प्री-ऑर्डर प्रक्रिया १० सप्टेंबरपासून सुरू झाली होती. तसेच हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये लाँच झाला होता.

नोकिया सी३ ची किंमत
नोकिया सी३ स्मार्टफोन भारतीय बाजारात 2GB रॅम +16GB स्टोरेज आणि 3GB रॅम +32GB स्टोरेज व्हेरिएंटसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या व्हेरिएंटची किंमत ७,४९९ आणि ८,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन Nordic Blue आणि Sand कलरमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची विक्री १७ सप्टेंबरपासून सुरू होईल.

नोकिया सी३ चे फीचर्स
नोकिया सी३ मध्ये 720×1,440 पिक्सल स्क्रीन रिजोल्यूशनसह 5.99 इंच एचडी+डिस्प्ले आहे. अँड्रॉइड 10 ओएसवर आधारित हा स्मार्टफोन octa-core Unisoc SC9863A प्रोसेसरवर काम करतो. यात एलईडी फ्लॅशसह ८ एमपीचा सिंगल कॅमेरा आहे, ज्यामध्ये अपर्चर एफ/2.0 असेल. तसेच सेल्फीसाठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.

नोकिया सी३ स्मार्टफोन दोन स्टोरेज मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे आणि मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने युजर्स त्याचे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवू शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय, ब्लूटूथ V4.2, जीपीएस, 3.5mm ऑडिओ जॅक आणि मायक्रो यूएसबी पोर्ट आहे. याशिवाय फोनला पॉवर देण्यासाठी 3,040mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Redmi 9A शी मोठी स्पर्धा
नोकिया सी३ स्मार्टफोन नुकत्याच लॉन्च झालेल्या रेडमी ९ए शी मोठी स्पर्धा देईल. रेडमी ९एची प्रारंभिक किंमत ६,७९९ रुपये आहे. रेडमी ९ए स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720×1,600 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी MediaTek Helio G25 चिपसेटसह 32GB इंटरनल स्टोरेज आहे. हे स्टोरेज मायक्रो-एसडी कार्ड वापरुन 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय युजर्सला या स्मार्टफोनच्या रियरमध्ये 13MP कॅमेरा आणि फ्रंटमध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर आधारीत MIUI 12 वर काम करतो.