वजन कमी करायचंय ? आहारात घ्या ‘हे’ 5 कमी कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट किंवा कार्ब्स असणारे पदार्थ कमी प्रमाणात खायला हवेत. कारण यामुळं शरीरातील मेदाचं प्रमाण वाढतं. यात कॅलरीज जास्त असतात. याशिवाय कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात खाल्ले तर शरीरातील इंसुलिन हे हार्मोन कमी होतं. यामुळंच मेदाचं प्रमाण वाढतं आणि लठ्ठपणा येतो. जाणून घेऊयात कमी कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ कोणते आहेत.

1) कोंबडी आणि मासे – यात कार्बोहायड्रेट कमी असतात आणि शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात. परंतु हे पदार्थ उकडून भाजून किंवा शेकून खायला हवेत.

2) दुधाची उत्पादने – दुधात प्रोटीन जास्त असतात. दुधासोबतच दही, ताक, लस्सी यांचंही सेवन तुम्ही करू शकता. पनीरही चांगला पर्याय आहे. याची तर भाजीही बनवता येते. फक्त तेलाचा वापर यात कमी करावा.

3) भाज्या – काकडी, ब्रोकोली, फुलकोबी यातही कार्बोहायड्रेट कमी असतात. बटाट्याचं सेवन कमी करा. यामुळं जास्त वजन वाढतं.

4) फळं – नारळ, पपई, सफरचंद, पीच आणि स्ट्रॉबेरी या फळांमध्ये देखील कार्बोहायड्रेट कमी असतात. कमी गोड फळांमध्ये कार्ब्स कमी असतात असं अजिबात नाही. केळी आणि चिकू यात जास्त कार्ब्स असतात. त्यामुळं त्याचं सेवन कमी असावं.

5) शेंगदाणे आणि सुकामेवा – जर कार्ब्स कमी खाल्ल्यानं मध्येच भूक लागत असेल तर शेंगदाणे किंवा सुकामेवा खा. रोज मुठभर शेंगदाणे आणि सुकामेवा खाल तर शरीराला सुक्ष्म पोषक द्रव्ये, मेद, तंतुमय पदार्थ, प्रथिने असतात. यामुळं भूक भागते आणि पोट भरलेलं रहातं.

5) बिया – भोपळा, सब्जा, अलसी, सूर्यफूल यांच्या बिया खूप चांगल्या असतात. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम आणि मॅग्नीजसोबत जीवनसत्व ए, बी, ई आणि फॅटी अॅसिड असतात.