भाजपा खासदाराकडून मोदी सरकारवर बोचरी टीका, म्हणाले – ‘अर्थमंत्रालयात कमी IQ वाले लोक आहेत, मोदींना अर्थव्यवस्थाच समजत नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी MP Swami यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयामध्ये कमी बुद्धी, कमी आयक्यू वाले लोक असून मोदींना अर्थव्य़वस्थेबाबत काही कळत नसल्याचे ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे एकेकाळी अर्थ मंत्रालय मोदींच्याच ताब्यात देण्याचे वक्तव्य स्वामी यांनी केले होते. खासदार स्वामी यांनी यापूर्वी अनेकदा पक्षाच्या, पक्ष नेतृत्वाच्या विरोधातही उभे राहिलेले आहेत.

अमेरिकेचा चॅनल Valuetainment च्या पॅट्रिक बेट डेव्हीडने खासदार स्वामी यांची मुलाखत घेतली. यावेळी डेव्हीड यांनी स्वामींना महात्मा गांधी, नेहरुंवर काही प्रश्न विचारले. स्वामींनी गांधींबद्दल चांगले शब्द काढले, परंतू नेहरुंबाबत त्यांनी चांगले मत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आले. डेव्हीड यांनी स्वामींना MP Swami आपण मोदींना अर्थमंत्री करण्याची मागणीही एकदा केली होती, याची आठवण करून दिली. यावर स्वामी हसले. मोदी माझे मित्र असून त्यांना मी 70 च्या दशकापासून ओळखतो. मला असे म्हणायचे होते की, मोदींना अर्थव्यवस्थेबाबत काहीच माहिती नाही. हाच शब्द त्यांच्यासाठी जास्त योग्य आहे.

कानातील संसर्गाकडे दुर्लक्ष नका करू, ‘हे’ घरगुती उपाय देवू शकतात दिलासा

देशाच्या अर्थमंत्रालयात कमी आयक्यू असलेले लोक आहेत. त्यांनाही कमी आयक्यूवाले लोक आवडतात. ते आज्ञाधारक लोकांना पसंत करतात. हीच त्यांची कमजोरी आहे. स्वतंत्र रुपाने काम करणारे लोक त्यांना आवडत नाहीत. मला त्यामुळेच दूर ठेवल्याचे स्वामीनी म्हटले आहे. दरम्यान खासदार स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटीच्या वर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. मोठ्या विद्यापीठात शिकलेल्या स्वामींकडे एक चिंतन करणारा नेता म्हणून पाहिले जाते.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’