उद्या पुणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे शहर आणि लष्कर जलकेंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणाच्या केबलमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे पर्वती आणि लष्कर जलकेंद्र बंद झाले आहेत.

पर्वती आणि लष्कर जलकेंद्र बंद असल्याने उद्या (मंगळवार) सकाळी पुणे शहराला होणारा पाणि पुरवठा कमी दाबाने होणार आहे. पुणे शहरातील सर्व पेठा, सहकार नगर, बिबवेवाडी आणि लष्कर जलकेंद्रावर असलेल्या सर्व भागांना पाणि पुरवठा कमी दाबाने होणार आहे. या भांगांना सायंकाळी होणारा पाणि पुरवठा पूर्ववत होणार असल्याचे महापालिकेच्या पाणि पुरवठा विभागाने कळवले आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.