मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी जाणून घ्या.

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मधुमेह नियंत्रित करणे खूप कठीण आहे. विशेषत: अन्नाची काळजी घेणे महत्वाचे आहे. मधुमेहासाठी मेथी फायदेशीर आहे.

मेथीचे सेवन केल्यास तुम्ही रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकता. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करणारा आहार घ्यावा. रक्तातील साखरेची पातळी वाढेल, अशा गोष्टी टाळाव्यात. बहुतेक रोग रक्तातील साखरेमुळे होऊ शकतात.

मधुमेह रूग्णांसाठी कोणता आहार असावा, असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकेल, अशा गोष्टी जाणून घ्या.

मेथी मधुमेहासाठी फायदेशीर आहे. मेथीत लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन बी 6, प्रथिने, फायबर, अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध आहे. मेथीच्या दाण्यांतील तंतू शरीरात साखर शोषण्याचे प्रमाण कमी करतात. तसेच इन्सुलिन वाढविण्यात मदत करतात. मेथी अनेक आश्चर्यकारक फायद्याने परिपूर्ण आहे.

मेथीचे दाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

मेथीमध्ये विद्रव्य फायबर असते. ग्लॅक्टोमनोन पचन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करण्यात फायदेशीर ठरू शकते. हे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याबरोबर टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह दोन्हीमध्ये मेथी फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

मेथी अशा प्रकारे वापरा

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खावेत. दाण्याची पावडर बनवून तुम्ही वापरू शकता. मेथी खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दाणे गरम पाण्यात भिजवून खावेत किंवा ते स्वयंपाक करण्याच्या पदार्थांमध्ये समाविष्ट करावेत.

मेथीचे खालील आजारावर फायदेशीर

1. कोलेस्टेरॉल

2. संधिवात वेदना

3. हृदयासाठी

4 मासिक पाळीत फायदेशीर

5. पाचक प्रणाली

6 रक्तदाब सुधारणे

7 कर्करोग

8 यकृत