Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात ‘या’ 5 गोष्टी खायला सुरूवात करा, वृद्धत्वापर्यंत शरीरात वाढणार नाही कोलेस्ट्रॉल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lower Cholesterol Diet | जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीराचे अवयव (Body Organs) कमकुवत होऊ लागतात. (Lower Cholesterol Diet) उदाहरणार्थ, हृदयाच्या भिंती जाड होतात, हाडे कमकुवत होतात आणि धमन्या किंवा रक्तवाहिन्या कठीण होतात. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा (Heart Problems) धोका वाढतो. विशेषतः वयाच्या 30 नंतर शरीरात असे बदल जास्त होतात. (How To Reduce Cholesterol).

 

वाढत्या वयानुसार, हृदयाशी संबंधित विकारांचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोलेस्टेरॉल (Cholestero) वाढणे. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची (Bad Cholesterol) वाढ अनेक घटकांवर अवलंबून असते ज्यात आनुवंशिकता, धूम्रपान (Smoking), जास्त मद्यपान (Alcohol), खाण्याच्या चुकीच्या सवयी (Wrong Eating Habits) आणि जास्त वजन (Overweight) इत्यादीचा समावेश होतो. लक्षात ठेवा की शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याने तुम्हाला हृदयविकार (Heart Disease), स्ट्रोक (Stroke) आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका होऊ शकतो.

 

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, डॉक्टर आणि तज्ञ तीस वर्षांच्या वयानंतर अशा जोखीम वाढवणार्‍या गोष्टी सोडण्याची आणि आरोग्यदायी गोष्टींचे सेवन वाढवण्याची शिफारस करतात. सुदैवाने, कोलेस्टेरॉल शरीरात जाण्यापासून रोखण्यासाठी काही आरोग्यदायी पदार्थ आहेत जे या वयानंतर तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता (Lower Cholesterol Diet).

 

विरघळणारे फायबर खा (Eat Soluble Fiber)
यासाठी विरघळणार्‍या फायबरचे सेवन वाढवावे. हे ओट्स (Oats), सफरचंद (Apple) आणि नाशपाती (Pear) यांसारख्या फळांमध्ये आणि अनेक प्रकारच्या शेंगांमध्ये आढळते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे उत्तम अन्न आहे. स्पोर्ट्स न्यूट्रिशन प्लेबुकच्या (Sports Nutrition Playbook) लेखिका एमी गुडसन (Amy Goodson) यांनी म्हटले आहे की, हे एक पोषक तत्व आहे जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते कारण ते पाण्यात विरघळून जेलसारखा पदार्थ तयार करते.

हेल्दी फॅट सेवन करा (Eat Healthy Fats)
या वयानंतर तुम्ही जेवणात हेल्दी फॅट (Healthy Fat) घेतले पाहिजे. आहारातील सॅच्युरेटेड फॅटचे (Saturated Fat) प्रमाण कमी करा, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकते. तळलेले पदार्थ टाळावेत. त्याऐवजी पॉलीअनसॅच्युरेटेड (Polyunsaturated Fat) आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (Monounsaturated Fat) असलेल्या गोष्टी खा. यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल (Olive Oil), कॅनोला ऑइल (Canola Oil), लीन मीट (Lean Meat), नट्स (Nuts), एवोकॅडो (Avocado) आणि मासे (Fish) यासारख्या गोष्टी खाऊ शकता.

 

फळे आणि भाज्या खा (Eat Fruits And Vegetables)
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर फळे (Fruits) आणि भाज्यांचे (Vegetables) सेवन जास्त करा.
फळे आणि भाज्यांचे सातत्याने सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करणारी संयुगे वाढू शकतात,
ज्यांना प्लांट स्टॅनॉल (Plant Stanol) किंवा स्टेरॉल (Sterol) म्हणतात, जे विरघळणार्‍या फायबरसारखे कार्य करतात.

 

गोड पेये घेणे थांबवा (Stop Drinking Sweet Drinks)
तज्ज्ञ सांगतात की, जास्त गोड पेय (Sweet Drinks) प्यायल्याने कालांतराने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे जास्त गोड पेये घेतात त्यांना ट्रायग्लिसराईड (Triglyceride) होण्याची शक्यता 53% जास्त असते.

कमी खा आणि जास्त वेळा खा (Eat Less And Eat More Often)
वयाच्या तीस वर्षांनंतर, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दिवसभरात कमी आणि जास्त वेळा खावे.
संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक त्यांच्या शरीराचे वजन 5-10% कमी करतात ते त्यांचे एकूण आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करू शकतात.
वजन कमी करण्यासाठी, अनेकदा थोडे-थोडे खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kapil Sibal | ‘ते दिग्गजही संन्यास घेतात, मग काँग्रेसचं नेतृत्त्व दुसऱ्या कोणाकडे का देत नाही ?’ – कपिल सिब्बल

 

Strong Bones Diet | हाडे ठेवायची असतील दिर्घकाळापर्यंत मजबूत, तर ‘या’ 5 गोष्टींचे रोज करा सेवन; जाणून घ्या

 

Government of Telangana | ‘युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार’; तेलंगणाच्या सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय